Bigg Boss OTT 3: अदनान शेखने घरात शिरताच सुरू केला गेम! विशाल आणि लव कटारियाच्या मैत्री पडणार फुट?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss OTT 3: अदनान शेखने घरात शिरताच सुरू केला गेम! विशाल आणि लव कटारियाच्या मैत्री पडणार फुट?

Bigg Boss OTT 3: अदनान शेखने घरात शिरताच सुरू केला गेम! विशाल आणि लव कटारियाच्या मैत्री पडणार फुट?

Published Jul 15, 2024 03:43 PM IST

Bigg Boss OTT 3 Latest Update: ‘बिग बॉस ओटीटी ३’ या शोचा एक नवा प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये अदनान शेख घरात एन्ट्री करताच आपला खेळ दाखवताना दिसला आहे.

अदनान शेख लवकेश कटारिया
अदनान शेख लवकेश कटारिया

Bigg Boss OTT 3 Latest Update:'बिग बॉस ओटीटी ३' हा लोकप्रिय शो जसजसा पुढे जात आहे, तसतसा अधिकच इंटरेस्टिंग होत चालला आहे. या शोमध्ये एकीकडे ‘वडापाव गर्ल’ म्हणजेच चंद्रिका दीक्षितला घराबाहेर काढण्यात आलं असताना, पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री झाली आहे. विशाल पांडेचा मित्र अदनान शेख वाईल्ड कार्ड म्हणून शोमध्ये दाखल झाला आहे. अदनान येताच त्याने घरच्यांवर आणि एल्विशवर भारी पडण्याबद्दल बरंच काही सांगितलं. अशातच आता या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे, ज्यात अदनान घरात प्रवेश करताच आपला खेळ दाखवताना दिसला आहे. अदनानने येताच विशाल आणि लवकेश कटारिया यांच्या मैत्रीला सुरुंग लावायला सुरुवात केली आहे.

'बिग बॉस ओटीटी ३'च्या नव्या प्रोमोने धुमाकूळ घातला आहे. या प्रोमोमध्ये अदनान शेखचा वाइल्ड कार्ड मेसेज कुटुंबातील सर्व सदस्यांच्या मोबाईलमध्ये येत असल्याचे दाखवण्यात आले आहे. हा मेसेज पाहिल्यानंतर जर कुणाची सर्वात धक्कादायक प्रतिक्रिया असेल तर ती म्हणजे लवकेश कटारियाची. लवकेश आणि एल्विशसोबत अदनानचे वैर बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. यानंतर प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, अदनानला पडद्यावर पाहून विशाल पांडेच्या चेहऱ्यावर आनंद येतो आणि तो त्याला प्रेमाने आदि म्हणतो.

अदनानने विशाल आणि लवकेशच्या मैत्रीला लावला सुरुंग!

वाईल्ड कार्ड एन्ट्री करताच बिग बॉस अदनान शेखला प्रश्न विचारतात की, तू इथे काही उद्देशाने आला आहेस का? यावर तो म्हणतो की, लवकेश कटारिया विशालचा वापर करत आहे. त्यावेळी मी असतो, तर मी त्याला कानाखाली मारली असती, असे लवकेशने म्हटले होते. त्यानंतरच अरमानने त्याच्यावर हात उचलला होता. मग, अदनान घरात शिरतो आणि विशाल त्याला घट्ट मिठी मारतो. यानंतर, लवकेश कटारिया म्हणतो की, तू त्याच्याशी खोटं बोलला आहेस, त्यावर अदनान म्हणतो की, तू का इतका गरम झाला आहेस यार. ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घराचे चित्र आता पूर्णपणे बदलणार असल्याचे प्रोमोवरून स्पष्ट होत आहे.

Tharala Tar Mag: अर्जुन आणि प्रिया डिनर डेटला जाणार; सायलीला अश्रू अनावर होणार! ‘ठरलं तर मग’मध्ये पुढे काय घडणार?

‘वडापाव गर्ल’ चंद्रिका दीक्षितला या ‘वीकेंड का वार’ दरम्यान या शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. याचीही चर्चा सोशल मीडियावर होत आहे. वडा पाव गर्ल शोमधून बाहेर पडताच पहिल्या वाईल्ड कार्डनेही घरात प्रवेश केला आहे. आता 'बिग बॉस ओटीटी ३'च्या घरात ‘साप-मुंगूस’ अशी लढत पाहायला मिळणार असल्याचं दिसतंय. पण, या शोमध्ये अदनानचं आगमन कोणतं वळण घेतं हे येत्या काही दिवसांतच कळेल.

Whats_app_banner