Bigg Boss OTT 3 Latest Update: ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरामध्ये खूप ड्रामा आणि गोंधळानंतर, नामांकन कार्य अखेर पूर्ण झाले आहे. या आठवड्यात ७ स्पर्धकांना घरा बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करण्यात आले आहे. चला, जाणून घ्या कोणाला या आठवड्यात नॉमिनेट करण्यात आले आहे आणि कोणावर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे.
थप्पड कांड नंतर मिळालेल्या शिक्षेमुळे अरमान मलिकला ‘बिग बॉस’ने संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट केले आहे. त्यामुळे अरमान मलिकला बाहेर काढण्यासाठी आधीच नॉमिनेट करण्यात आले आहे. या आठवड्यात बिग बॉसने घराचा एक महत्त्वाचा नियम मोडल्यामुळे वाईल्ड कार्ड स्पर्धक अदनान शेखलाही नॉमिनेट करण्यात आले आहे. सध्या अरमान मलिक हा घराचा प्रमुख आहे. त्यामुळे बिग बॉसने अरमान मलिकला विशेष अधिकार दिला आहे की, तो घरातून बाहेर काढण्यासाठी ४ लोकांना नॉमिनेट करू शकतो. जास्त विचार न करता, अरमान मलिकने थेट सना मकबूल, सना सुलतान, विशाल पांडे आणि लवकेश कटारिया यांना घरातून बाहेर काढण्यासाठी नामांकित केले आहे.
घरातील टास्क जिंकल्यानंतर, रणवीर शौरीला देखील एका स्पर्धकाला बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करण्यास सांगितले आणि त्याने यासाठी दीपक चौरसियाचे नाव घेतले. रणवीरकडे फारसे पर्याय नव्हते. त्यांला एलिमिनेशनसाठी साई केतन राव, कृतिका मलिक, शिवानी कुमारी आणि दीपक यांच्यापैकी एकाला नॉमिनेट करावे लागणार होते.
विशेष म्हणजे यावेळी कोणाला घराबाहेर काढायचे आहे आणि कोणाला या घरात ठेवायचे आहे, हे केवळ स्पर्धकांच्या हातात आहे. यावेळी जनता कोणत्याही स्पर्धकाला मतदान करू शकत नाही. अशा परिस्थितीत बाहेरचे लोक एकत्र येऊन एका उमेदवाराला हटवतील की, सगळी ताकद घराच्या कॅप्टनकडे जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जर, सार्वजनिक मतदानातून निर्णय झाला, तर निश्चितच सना सुलतान किंवा दीपक चौरसिया यांचा बिग बॉस ओटीटी ३मधील प्रवास संपणार आहे.
‘बिग बॉस ओटीटी ३’चे घर सध्या दोन गटात विभागले गेले आहे. एका गटात रणवीर शौरी, अरमान मलिक, कृतिका मलिक, दीपक चौरसिया, साई केतन राव आणि सना सुलतान यांचा समावेश आहे. तर, दुसऱ्या गटात सना मकबूल, लवकेश कटारिया, शिवानी कुमारी आणि विशाल पांडे यांचा समावेश आहे. नेजी आणि अदनान शेख कोणाच्या बाजूने आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
संबंधित बातम्या