Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या निर्मात्यांवर आणि स्पर्धकांवर कारवाई करण्याची मागणी! नेमकं झालं तरी काय?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या निर्मात्यांवर आणि स्पर्धकांवर कारवाई करण्याची मागणी! नेमकं झालं तरी काय?

Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या निर्मात्यांवर आणि स्पर्धकांवर कारवाई करण्याची मागणी! नेमकं झालं तरी काय?

Published Jul 22, 2024 06:44 PM IST

Bigg Boss OTT 3 Latest news: मनीषा कायंदे यांनी आपल्या निवेदनात ‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’च्या निर्माते, प्रेक्षक व सहभागी कलाकारांवर तातडीने योग्य ती कारवाई करत प्रक्षेपण बंद करण्यात यावे’, असे म्हटले आहे.

Bigg Boss OTT 3 Latest news
Bigg Boss OTT 3 Latest news

Bigg Boss OTT 3 Latest news: बिग बॉस ओटीटी ३’चा सध्या सगळीकडे जोरदार बोलबाला आहे. ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये सध्या रोजच काही ना काहीतरी ड्रामा पाहायला मिळत आहे. एकीकडे स्पर्धक एकमेकांशी हाणामारी करताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे काही स्पर्धक एकमेकांवर शेरेबाजी करताना दिसत आहेत. अरमान मलिक आणि लवकेश कटारिया यांनी केलेल्या हाणामारीनंतर आता आणखी एक नवे प्रकरण समोर आले आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून, यामध्ये युट्युबर अरमान मलिक आणि त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिक बिग बॉसच्या घरातच इंटिमेट होताना दिसले आहेत.

त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सगळीकडेच व्हायरल होतोय. दुसरीकडे, अरमानची पहिली पत्नी पायल मलिक ही एलिमिनेट होऊन घराबाहेर आली आहे. तिने देखील या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ फेक असल्याचं तिने म्हटले आहे. मात्र, आता या शोवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच शोचे निर्माते आणि स्पर्धक यांच्यावर तातडीची कारवाई व्हावी, असे एक निवेदन शिवसेना नेत्या प्रा.डॉ. मनीषा कायंदे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना सुपूर्द केले आहे.

Dada Kondke: दादा कोंडके यांच्या चित्रपटांची ‘कलरफुल’ धमाल अनुभवा! कधी आणि कुठे? जाणून घ्या...

मनीषा कायंदे यांचे मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन

मनीषा कायंदे यांनी आपल्या निवेदनात लिहिले आहे की, ‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’च्या निर्माते, प्रेक्षक व सहभागी कलाकारांवर तातडीने योग्य ती कारवाई करत प्रक्षेपण बंद करण्यात यावे.’ त्यांनी पुढे लिहिले की, ‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’ या रियॅलिटी शोचे प्रक्षेपण २१ जून पासून सुरू झाले आहे. दररोज रात्री नऊ वाजता ओटीटीवर त्याचे प्रसारण होत आहे. दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दररोज लाखो कुटुंब हा शो बघत असतात. मात्र, १८ जुलै रोजी प्रसारित करण्यात आलेल्या या शोच्या भागामध्ये कलाकार कॅमेरासमोर अतिशय बिभित्स आणि किळसवाणे कृत्य करताना दाखवण्यात येत होते. सदर शोच्या दरम्यान अरमान मलिक व कृतिका मलिक या कलाकारांनी कौटुंबिक नात्यांच्या सर्व सीमा पार करत व सामाजिक मूल्यांची वाट लावत, शरमेने मान खाली जाईल, असे कृत्य केले आहे.

सदर प्रकार अत्यंत दुर्दैवी असून, अशा प्रकारचे चित्रीकरण व प्रक्षेपण करणाऱ्या सर्व संबंधितांवर योग्य तातडीने योग्य कलमान्वये कारवाई व्हावी व सदर शो बंद व्हावा, या करता अनेकांनी आवाज उठवला आहे. तरी, बिग बॉस ओटीटी सीझन ३सारख्या वादग्रस्त रियॅलिटी शो संदर्भातील निर्माते कलाकार व प्रक्षेपक यांच्यावर करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत माहिती घेण्यासाठी हे निवेदन करत असल्याचे, त्यात म्हणण्यात आले आहे.

Whats_app_banner