मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss OTT 3: थप्पडकांड नंतरही विशालच्याच बाजूला जाऊन बसली कृतिका! अरमानचा चढला पारा; म्हणाला...

Bigg Boss OTT 3: थप्पडकांड नंतरही विशालच्याच बाजूला जाऊन बसली कृतिका! अरमानचा चढला पारा; म्हणाला...

Jul 09, 2024 03:12 PM IST

Bigg Boss OTT 3 Latest Episode: अरमान मलिक त्याची पत्नी कृतिका मलिक हिच्यावर खूप रागावला होता. आता नेमकं काय झालं? वाचाच…

Bigg Boss OTT 3 Armaan Malik Kritika Malik
Bigg Boss OTT 3 Armaan Malik Kritika Malik

Bigg Boss OTT 3 Latest Episode: 'बिग बॉस ओटीटी ३'मधील थप्पड कांडनंतर अरमान मलिक आणि विशाल पांडे यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. आता अरमान ज्या ठिकाणी बसतो, त्या ठिकाणी विशाल बसणे टाळत आहे. इतकंच नाही, तर तो कॅमेऱ्यासमोर कृतिका मलिकवर केलेल्या वक्तव्यावरही वारंवार स्पष्टीकरण देत आहे. दरम्यान, विशालमुळे अरमान आणि कृतिका यांच्यातही भांडण झाले आहे. नॉमिनेशन टास्क सुरू करण्यापूर्वी बिग बॉसने सर्व लोकांना लिव्हिंग एरियामध्ये बोलावले होते.

यावेळी अरमान मलिक सोफ्याच्या एका कोपऱ्यात बसला होता. तर, विशाल पांडे सोफ्याच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन बसला होता. जेव्हा, कृतिक मलिक बिग बॉसच्या बोलवण्यानंतर लिव्हिंग एरियात आली, तेव्हा ती थेट विशाल बसलेल्या बाजूला जाऊन बसली.

Gharoghari Matichya Chuli: जानकी शोधू शकेल का नानांच्या पहिल्या लग्नाचं सत्य? ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये आज काय घडणार?

अरमान कृतिकावर संतापला!

कृतिकाचं हे वागणं पाहिल्यानंतर अरमान कृतिकावर प्रचंड संतापला. अरमान म्हणाला, 'आता तरी इकडे येऊन बस. अजून तुझे डोळे उघडले नाहीत का?' यानंतर कृतिका मलिक हसली आणि म्हणाली, 'माझे डोळे उघडले आहेत. आणि ते नेहमीच उघडे असतात'.' यानंतर कृतिका उठून अरमानच्या बाजूला जाऊन बसली.

ट्रेंडिंग न्यूज

यावेळी अरमान तिला म्हणाला की, ‘तू अजूनही डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहेस, असं मला वाटतंय. तुझ्यासाठी आता एखादा लेन्सवाला चष्मा बनवण्याची आवश्यकता आहे वाटतं.’ यावर कृतिका म्हणाली की, ‘यार, माझे डोळे उघडले आहेत. तिथे जागा होती म्हणून मी शिवानीच्या शेजारी जाऊन बसले.’

अरमान म्हणाला- मला असं वाटतंय...

अरमान मलिक म्हणाला की, ‘तू मला हे नको सांगूस की, जेव्हा मी आले, तेव्हा तिथे जागा होती म्हणून मी तिथे गेले, मला माहित नव्हतं म्हणून मी हे केलं... मला आता मी तुझ्याबरोबर आलोच नाहीये असं वाटत आहे.’ यावर कृतिका म्हणाली की, ‘इथे जागा नव्हती, म्हणून मी तिथेच बसले.’ अरमान म्हणाला, ‘नो प्रॉब्लेम. मी तुझ्याबरोबर आलोच नाहीये असं मला वाटतं.’ त्यानंतर कृतिका म्हणाली की, ‘सना तुझ्या शेजारी बसली होती. तिथे जागाच दिसत नव्हती, म्हणून मी शिवानीजवळ जाऊन बसले.’ यावर अरमान संतापत म्हणाला की, मला आणि सगळ्यांना सगळं दिसतंय.

WhatsApp channel
विभाग