Bigg Boss OTT 3: कठोर कारवाई होणार! अरमान आणि कृतिकाच्या व्हायरल व्हिडीओवर जिओ सिनेमाने सोडले मौन
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss OTT 3: कठोर कारवाई होणार! अरमान आणि कृतिकाच्या व्हायरल व्हिडीओवर जिओ सिनेमाने सोडले मौन

Bigg Boss OTT 3: कठोर कारवाई होणार! अरमान आणि कृतिकाच्या व्हायरल व्हिडीओवर जिओ सिनेमाने सोडले मौन

Published Jul 24, 2024 07:58 PM IST

Bigg Boss OTT 3: अरमान मलिक आणि कृतिका मलिक यांच्या व्हायरल व्हिडिओवर जिओ सिनेमाने अधिकृत निवेदन जारी केले आहे.

कठोर कारवाई होणार! अरमान आणि कृतिकाच्या व्हायरल व्हिडिओवर जिओ सिनेमाने सोडले मौन
कठोर कारवाई होणार! अरमान आणि कृतिकाच्या व्हायरल व्हिडिओवर जिओ सिनेमाने सोडले मौन

Bigg Boss OTT 3 Latest Update: 'बिग बॉस ओटीटी ३'मधील स्पर्धक अरमान मलिक आणि त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिक यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओने सध्या सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. लोक हा व्हिडीओ शेअर करत दावा करत आहेत की, अरमान आणि कृतिकाने 'बिग बॉस'च्या घरात अश्लील कृत्य केले आहे. या व्हिडीओमध्ये अरमान आणि कृतिका मलिक बिग बॉसच्या घरात इंटीमेट होताना दिसले आहेत. मात्र, या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना अरमानची पहिली पत्नी पायल मलिकने हा दावा फेटाळून लावला होता. तर, आता जिओ सिनेमाने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे.  यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

काय म्हणालं जिओ सिनेमा?

ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमाने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 'जिओ सिनेमा आपल्या प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केलेल्या प्रत्येक कंटेंटच्या गुणवत्तेची पूर्ण काळजी घेतो. जिओ सिनेमावर प्रसारित होणाऱ्या 'बिग बॉस ओटीटी'मध्ये असा कोणताही अश्लील कंटेंट दाखवण्यात आलेला नाही. जो व्हिडीओ व्हायरल होत आहे तो एडिट केलेला व्हिडीओ आहे. त्या व्हिडीओशी छेडछाड करण्यात आली आहे. ही फेक क्लिप तयार होणे आणि व्हायरल होणे ही दोन्ही चिंतेची बाब आहे. 

जिओ सिनेमाने पुढे म्हटले आहे की, ‘आमची टीम ही क्लिप कोणी एडिट केली याचा शोध घेत आहे. बिग बॉस ओटीटी आणि जिओ सिनेमाविरोधात असा अपमानजनक व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.’

Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या निर्मात्यांवर आणि स्पर्धकांवर कारवाई करण्याची मागणी! नेमकं झालं तरी काय?

कारवाईची मागणी!

'बिग बॉस ओटीटी'वर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना सचिव आणि प्रवक्त्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली होती. मनीषा कायंदे यांनी आपल्या निवेदनात लिहिले होते की, ‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’च्या निर्माते, प्रेक्षक व सहभागी कलाकारांवर तातडीने योग्य ती कारवाई करत प्रक्षेपण बंद करण्यात यावे. या शोच्या भागामध्ये कलाकार कॅमेरासमोर अतिशय बिभित्स आणि किळसवाणे कृत्य करताना दाखवण्यात येत होते. सदर शोच्या दरम्यान अरमान मलिक व कृतिका मलिक या कलाकारांनी कौटुंबिक नात्यांच्या सर्व सीमा पार करत व सामाजिक मूल्यांची वाट लावत, शरमेने मान खाली जाईल, असे कृत्य केले आहे.’ 

एवढंच नाही तर संसदेच्या चालू अधिवेशनात ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी कायदा आणण्याची विनंती माहिती आणि प्रसारण मंत्र्यांना करणार असल्याचंही त्यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.

Whats_app_banner