'बिग बॉस ओटीटी'चा तिसरा सिझन आता संपत आला आहे. यंदाच्या सिझनमधील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. आता बिग बॉस ओटीटीचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. पण हा फिनाले कधी आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...
'बिग बॉस ओटीटी ३'चा ग्रँड फिनाले ४ ऑगस्ट म्हणजेच रविवारी पार पडणार असल्याचे म्हटले जात आहे. पण 'वीकेंड का वार' या भागात अनिल कपूर यांनी स्पष्ट केले की, बिग बॉस ओटीटीचा ग्रँड फिनाले ४ ऑगस्ट नसून २ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. म्हणजेच सना मकबूल, नेझी, रणवीर शौरी, सई केतन राव आणि कृतिका मलिक यांच्यापैकी 'बिग बॉस ओटीटी-३'चा विजेता कोण होणार हे उद्याच कळणार आहे.
बिग बॉसशी संबंधीत बातमी शेअर करणाऱ्या 'द खबरी' या सोशल मीडिया पेजवर 'बिग बॉस ओटीटी-३'ची विजेती सना मकबूल असल्याचे सांगण्यात आले आहे. नेझी ही दुसऱ्या क्रमांकावर आहे तर रणवीर शौरी हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता या पेजवर देण्यात आलेली माहिती कितपत खरी ठरते हे पाहण्यासाठी चाहत्यांना उद्याची वाट पाहावी लागणार आहे. यापूर्वी दिव्या अग्रवाल 'बिग बॉस ओटीटी १'ची विजेती ठरली होती. तर एल्विश यादवने 'बिग बॉस ओटीटी २'चे विजेतेपद पटकावले होते. आता बिग बॉस ओटीटी ३चा विजेता कोण ठरणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
मागच्या वेळी 'बिग बॉस ओटीटी'च्या विजेत्याला २५ लाख रुपये मिळाले होते. त्यामुळे यंदाही विजेत्याला केवळ २५ लाख रुपये मिळतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. रणवीर शौरीने बिग बॉसमध्ये असेही म्हटले होते की, त्याला ट्रॉफीची पर्वा नाही, त्याला फक्त ते 25 लाख रुपये हवे आहेत जेणेकरून तो आपल्या मुलाची कॉलेजची फी भरू शकेल.
वाचा: 'कॅमेरासमोर जाईल की महाराष्ट्राचा छोटा पुढारी गुदगुल्या करतो', कोल्हापूरच्या गड्यावर संतापला घनःश्याम
'बिग बॉस ओटीटी-3'चा ग्रँड फिनाले पाहायचा असेल तर तुम्ही जिओ सिनेमा हे ओटीटी अॅप डाऊनलोड करा. या अॅपवर तुम्हाला ग्रँड फिनाले सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत सगळे अपडेट्स मिळतील. आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे ती म्हणजे कोणता स्पर्धक ओटीटीची ट्रॉफी स्वत:च्या नावे करणार.
संबंधित बातम्या