'बिग बॉस ओटीटी ३' या शोचा प्रत्येक एपिसोड हा प्रेक्षकांसाठी काही तरी सरप्राइज घेऊन येत असतो. या रिअॅलिटी शोमध्ये नुकताच एका अनपेक्षित पाहुण्याचे आगमन झाले आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक लवकेश कटारियाला शिक्षा देण्यात आली आहे. त्याला गार्डनच्या परिसरात हाथकडी घालून बसवण्यात आले आहे. दरम्यान, त्याच्या फूटेजमध्ये एका अनपेक्षीत पाहुण्याचे शोमध्ये आगमन झाल्याचे दिसत आहे.
लव्हकेश हातकडी घालून गार्डन परिसरात आपली शिक्षा भोगत असतो. त्याच्या गार्डनच्या फूटेजमध्ये पाठी मागच्या परिसरात काळ्या रंगाचा साप दिसत आहे. हा साप बिग बॉसच्या घरात पोहोचला कसा? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. स्पर्धकांनी हा साप पाहिला तेव्हा घरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. तसेच लव्हकेशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांना धक्का बसला आहे.
वाचा : पावसावरील 'ती' पोस्ट अभिनेत्री सई ताम्हणकरने केली डिलिट, काय आहे नेमकं कारण?
एका यूजरने सोशल मीडियावर बिग बॉस ओटीटीच्या घरातील क्लिप शेअर केली आहे. तसेच लव्हकेशला दिलेल्या शिक्षेचा निषेध केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्या चाहत्याने, "हे अमानुष, गंभीर वर्तन आहे #BBOTT3 (दोन हृदयद्रावक इमोजी) तू खचून जाऊ नकोस #LuvKataria" असे कॅप्शन दिले आहे. दुसऱ्या एका यूजरने 'माणूसकी हा प्रकार विसरले आहेत का बिग बॉस ओटीटीचे निर्माते' असे म्हणत संताप व्यक्त केला आहे. तर काही यूजर्सने हा एडीटेड व्हिडीओ असल्याचे म्हटले आहे.
वाचा: सलमान खानपासून रणवीर सिंगपर्यंत सेलिब्रिटींनीही अनंत-राधिकाच्या हळदीत केली धमाल
लव्हकेशला जवळपास १२ तासांपेक्षा जास्त वेळ हातकडी घालून शिक्षा देण्यात आली आहे. पण त्याला शिक्षा का देण्यात आली हे अद्याप समोर आलेले नाही. अरमान मलिकच्या थप्पड मारण्याच्या घटनेनंतर त्याच्यात आणि विशाल पांडेमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे. विशालने लव्हकेशसोबत मजेशीर गप्पा मारताना अरमानला 'लकी' म्हटले होते आणि स्पोर्ट्स वेअरमध्ये वर्कआऊट करणारी त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिककडे बोट दाखवले होते.
वाचा: या आरोपींना फाशीची शिक्षा द्या; ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणात ज्येष्ठ अभिनेत्याच्या पुतणीचा मृत्यू
'बिग बॉस ओटीटी ३' या शोचा अनिल कपूर हा होस्ट आहे. पहिल्यांदाच असे झाले असेल की करण जोहर नंतर ओटीटीचे सूत्रसंचालन अनिल कपूर यांच्याकडे आले आहे. नाहीतर बिग बॉस या शोचे नाव घेतले तरी चाहत्यांच्या तोंडात सलमान खानचे नाव येते.
संबंधित बातम्या