वडापाव गर्ल, हर्षद चोप्रा ते शहजादा धामी; ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये कोणकोण झळकणार? समोर आली नावं!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  वडापाव गर्ल, हर्षद चोप्रा ते शहजादा धामी; ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये कोणकोण झळकणार? समोर आली नावं!

वडापाव गर्ल, हर्षद चोप्रा ते शहजादा धामी; ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये कोणकोण झळकणार? समोर आली नावं!

Jun 12, 2024 08:59 AM IST

‘बिग बॉस ओटीटी ३’ या आगामी सीझनसाठी खालील कलाकार आणि सोशल मीडिया सेलिब्रिटींना लॉक करण्यात आल्याचे समजते आहे.

वडापाव गर्ल, हर्षद चोप्रा ते शहजादा धामी; ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये कोणकोण झळकणार?
वडापाव गर्ल, हर्षद चोप्रा ते शहजादा धामी; ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये कोणकोण झळकणार?

रिअॅलिटी शो बिग बॉस ओटीटीचा तिसरा सीझन ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर होस्ट करणार आहेत. सोमवारी निर्मात्यांनी या शोचा नवीन प्रोमो रिलीज केला आये. या प्रोमोमध्ये अनिल कपूर चाहत्यांना आश्वासन देताना दिसत आहे की, ते देखील या शोमधून प्रक्षकांना ट्रीट देणार आहे. बिग 'बॉस ओटीटी ३' च्या स्पर्धकांची संभाव्य यादी इंडिया टुडेने शेअर केली आहे.

'ये रिश्ता क्या कहलाता है'चा अभिनेता हर्षद चोपडा आणि शहजादा धामी यांची ‘बिग बॉस ओटीटी ३’ साठी निवड करण्यात आली आहे. मालिकेचे निर्माते राजन शाही यांनी क्रिएटिव्ह डिफरन्समुळे हर्षदसोबत वाद झाल्याचं नुकतंच सांगितलं होतं. तरर, अव्यावसायिक वर्तनाच्या आरोपावरून शोमधून काढून टाकण्यात आल्यामुळेही शहजादा चर्चेत आली होता. बिग बॉस ओटीटी स्पर्धकांच्या यादीत टेम्पटेशन आयलंड विजेती चेष्ठा भगत आणि निखिल मेहता यांचा देखील समावेश आहे. निखिलने नुकताच चेष्विठारोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. कारण, चेष्ठा व मी आधीच रिलेशनशिपमध्ये असल्याचा आणि तिच्याशी खोटं बोलल्याचा आरोप त्याच्यावर केला होता.

Viral Video: अमिताभ बच्चन घेऊन आले पुष्पगुच्छ; तर गोविंदाने स्टेजवरच केला डान्स! 'या' व्हिडीओतील कलाकार ओळखून दाखवा

‘बिग बॉस ओटीटी ३’ साठी सोशल मीडिया पर्सनालिटी विशाल पांडे आणि चंद्रिका दीक्षित उर्फ इन्स्टाग्रामची ‘वडापाव गर्ल; कन्फर्म झाली आहे. ’बिग बॉस ओटीटी'च्या घरात सरप्राईज एन्ट्री साठी निर्माते बॉलिवूडच्या एका लोकप्रिय सेलिब्रिटीशी वाटाघाटी करत असल्याचे वृत्त आहे.

‘बिग बॉस ओटीटी ३’ हा सीजन २१ जूनपासून जिओसिनेमावर स्ट्रीम होणार आहे. ‘बिग बॉसच्या या ओटीटी स्पिन-ऑफ - पहिल्यांदा वूटवर प्रदर्शित होत होता, ज्याचे सूत्रसंचालन दिग्दर्शक करण जोहर करत होते. मात्र, नंतर दुसऱ्या सीझनसाठी अभिनेता आणि बिग बॉसहोस्ट सलमान खानकडे सूत्रे सोपवण्यात आली होती.

सोनाक्षी आणि जहीर इक्बालच्या लग्नाची तारीख आली समोर! ‘ही’ कलाकार मंडळी होणार लग्नात सामील

बिग बॉस ओटीटीचा तिसरा सीझन होस्ट करण्यासाठी उत्सुक अनिल कपूर म्हणाला, "बिग बॉस ओटीटी आणि मी एक ड्रीम टीम आहोत. आम्ही दोघंही मनापासून तरुण आहोत; लोक अनेकदा म्हणतात गंमतीने की, मी म्हातारपण उलट करत आहे. परंतु. बिग बॉसमध्ये माझं एक वेगळं रूप सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. काहीतरी रोमांचक करण्याचा प्रयत्न करणं नेहमीच असतो. आणि तीच ऊर्जा मी बिग बॉसमध्ये आणणार आहे! अनस्क्रिप्टेड रिअॅलिटीमध्ये प्रत्येकासाठी काहीतरी असतं. हास्य, नाटक आणि आश्चर्यकारक ट्विस्ट आणि आता मी त्यात माझा स्वतःचा टच देण्याची आणखी वाट पाहू शकत नाहीये.

Whats_app_banner