मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'अभिनेत्रीच्या ओठांचा कुत्र्याने घेतला चावा', रिअॅलिटीशोमध्ये सांगितला भीतीदायक प्रसंग

'अभिनेत्रीच्या ओठांचा कुत्र्याने घेतला चावा', रिअॅलिटीशोमध्ये सांगितला भीतीदायक प्रसंग

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 23, 2024 01:21 PM IST

अभिनेत्रीने स्वत: 'बिग बॉस ओटीटी' या रिअॅलिटी शोमध्ये याबाबत खुलासा केला आहे. चला जाणून घेऊया अभिनेत्रीसोबत नेमके काय झाले होते?

Sana makbul: सानाचा भीतीदायक किस्सा
Sana makbul: सानाचा भीतीदायक किस्सा

नुकताच बिग बॉस ओटीटी हा रिअॅलिटी शो सुरु झाला आहे. या शोचे तिसरे पर्व सुरु झाल्यापासूनच चर्चेत आहे. यंदा या शोमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतच मिडिया इन्फ्ल्यूएन्सरदेखील सहभागी झाले आहेत. जवळपास १६ स्पर्धक या शोमध्ये दिसत आहेत. त्यामधील एका अभिनेत्रीने खऱ्या आयुष्यातील धक्कादायक अनुभव सांगितला आहे. तिच्या ओठांवर कुत्र्याने चावा घेतला होता.

बिग बॉस ओटीटी या रिअॅलिटी शोमध्ये अभिनेत्री सना मकबूल आणि पॉलोमी दास या दोघींची चांगली मैत्री झाली आहे. या दोघीही सतत एकमेकींच्या आयुष्यातील गोष्टी शेअर करताना दिसतात. दरम्यान, पॉलोमी सनाला ओठांजवळ असलेल्या जखमेविषयी विचारते. तेव्हा तिने घडलेला भीतीदायक किस्सा सांगितला आहे.
वाचा: 'रेखाकडे असे काय आहे जे माझ्याकडे नाही', शबाना आझमी यांनी दिग्दर्शकाला विचारला होता प्रश्न

ट्रेंडिंग न्यूज

काय म्हणाली सना?

"माझ्या ओठांवर असलेल्या या खुणांमुळे सकाळी शिवानी माझ्यावर हासत होती. पण ती खूण कसली आहे किंवा माझ्या आयुष्यात किती त्रासदायक होते हे मलाच माझे माहिती. मला एका मोठ्या सर्जरीमधून जावे लागे होते. एका कुत्र्याने माझ्या ओठांवर चावा घेतला होता. त्याची ही खूण आहे" असे सना म्हणाली.
वाचा: पाच जन्मातील बायका एकाच जन्मात! स्वप्नील जोशीच्या 'बाई गं'चा टीझर चर्चेत

कोण आहे सना?

सना ही सध्या बिग बॉस ओटीटी ३मध्ये दिसत आहे. त्यापूर्वी ती खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्ये दिसत होती. या शोमध्ये जाण्यापूर्वी सनाने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने आयुष्यातील भीतिदायक किस्सा सांगितला होता. ही मुलाखत तिने २०२०मध्ये दिली होती. एका कुत्र्याने सनावर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये सनाच्या चेहऱ्यावर आणि ओठांवर कुत्र्याने चावा घेतला होता. त्यामुळे सनाची प्लास्टिक सर्जरी झाली होती. तसेच तिला ग्राफ्टिंग इतर सर्जलीला सामोरे जावे लागले होते.
वाचा: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील कलाकाराचा १६ वर्षांनी मालिकेला रामराम, चाहत्याची पोस्ट

बिग बॉस ओटीटी विषयी

२१ जून पासून बिग बॉस ओटीटी ३ हा सिझन सुरु झाला आहे. सर्वजण या शोची आतुरतेने वाट पाहात होते. यंदा या शोमध्ये बॉलिवूड कलाकरांसोबतच काही सोशल मिडिया इन्फ्ल्यूएंसर देखील सहभागी झाले आहेत. अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी तसेच दिल्लीमधील वडापाव गर्ल देखील सहभागी झाल्याचे पाहायला मिळते. सध्या सगळीकडे बिग बॉस ओटीटीची चर्चा सुरु आहे.

WhatsApp channel