Bigg Boss OTT 3 Contestant Adnaan Shaikh: ‘बिग बॉस ओटीटी ३’चा स्पर्धक अदनान शेखने याने चाहत्यांना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. आता अदनान शेख लग्न बंधनात अडकणार आहे, त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी यापेक्षा मोठी ट्रीट कोणती असूच शकत नाही. अदनानच्या लग्नाच्या बातम्या सध्या जोरात सुरू आहेत आणि चाहत्यांना त्याच्या लग्नाचा तपशील जाणून घ्यायचा आहे. आता अदनान कधी लग्न करणार आहे, हे जाणून घेऊया...
‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये सामील झाल्यामुळे अदनान शेख चांगलाच चर्चेत आला होता. अदनान शेखने नुकतीच बॉम्बे टाइम्सला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने आपल्या लग्नाबद्दल सांगितले आहे. ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या या स्पर्धकाने त्याच्या लग्नाबद्दल बोलताना सांगितले की, तो त्याच्या दीर्घकालीन मैत्रिणीसोबत लग्न करणार आहे. अदनान शेख हा गेल्या काही वर्षांपासून आयेशा शेख हिला डेट करत आहे. आता मिडिया रिपोर्ट्सनुसार, अदनानहे निकाह फंक्शन्स या महिन्यापासून म्हणजेच २० सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. अदनान लग्नाआधीच्या तयारीत व्यस्त आहे.
अदनान आणि आयेशाच्या लग्नाआधीचे कार्य २० सप्टेंबरपासून सुरू होणार असले, तरी त्यांचे लग्न २४ सप्टेंबरला होणार आहे. एवढेच नाही तर अदनान आणि आयेशाचा वलीमा २५ सप्टेंबरला ठेवण्यात आला आहे. अदनान त्याच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक आहे. तसेच तो म्हणाला की, तो स्वतः त्याच्या लग्नाची सर्व तयारी करत आहे. अदनान म्हणाला की, मी आधीच एक जबाबदार व्यक्ती आहे आणि आता मी एक जबाबदार पती बनणार आहे.
अदनान शेख नुकत्याच संपलेल्या ‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’चा स्पर्धक होता. अदनानने ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये वाईल्ड कार्ड म्हणून प्रवेश केला होता. परंतु अवघ्या दोन दिवसातच त्याला बाहेर काढण्यात आले. जेव्हा, अदनान शोमध्ये गेला, तेव्हा त्याच्या चाहत्यांना वाटले की तो नक्कीच काहीतरी आश्चर्यकारक करेल. परंतु, तसे होऊ शकले नाही.
घरातून बाहेर काढल्यानंतर अदनानला खूप ट्रोल करण्यात आले होते. यावरून त्याने निर्मात्यांना फटकारले. अदनान शेखच्या प्रवासाबद्दल बोलयाचे तर, त्याने टिकटॉकर म्हणून आपला प्रवास सुरू केला होता. अदनान सोशल मीडियावर एक प्रसिद्ध चेहरा आहे आणि त्याने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही आपली प्रतिभा दाखवली आहे.