ओटीटी प्लॅटफॉर्मवरील रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर करताना दिसत आहेत. या कार्यक्रमात आता एकाच वेळी दोन स्पर्धकांना घराबाहेर काढण्यात आले आहे. हा प्रेक्षकांसाठी देखील मोठा धक्का आहे. एकाच आठवड्यात बिग बॉस ओटीटीच्या घरातून बाहेर पडणारे हे दोन कलाकार कोणते? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.
'बिग बॉस ओटीटी' ३मधून दीपक चौरसियाच्या घराबाहेर पडल्यानंतर एलिमिनेशन होणार नाही असे सर्वांना वाटत होते. पण बिग बॉसने पुन्हा एकदा खेळ उलटवला आहे. बिग बॉस ओटीटीच्या घरातील दोन स्पर्धकांचा प्रवास संपल्यामुळे प्रेक्षकांना देखील बसला आहे. आता हे स्पर्धक कोण आहेत? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
रिअॅलिटी शो बिग बॉस ओटीटी ३ मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आलेला अदनान शेख आणि सतत सर्वांचे लक्ष वेधून घेणारी सना सुलतान घराबाहेर पडली आहे. लव कटारिया आणि एल्विश यादव यांचा कट्टर शत्रू मानला जाणारा अदनान शेख जेव्हा घरात आला, तेव्हा जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळाली होती. मात्र लव कटारियासोबत काही शाब्दिक भांडण झाल्यानंतर दोघांमध्ये काहीशी मैत्री झाली होती. बहुतेक वेळा दोघेही एकत्र वेळ घालवताना दिसले. अदनान शेखने बाहेरच्या बहुतेक गोष्टींबद्दलही वक्तव्य केले. त्यामुळे बिग बॉसने देखील अदनानला फटकारले होते.
वाचा: मनोज बाजपेयीचा 'भैय्या जी' ओटीटीवर रिलीज होणार, जाणून घ्या कधी आणि कुठे
एकीकडे अदनान शेख सारखा इतर घरातील कोणताही स्पर्धक दिसला नसल्यामुळे नेटकऱ्यांनी टीका केली होती. तर दुसरीकडे सना सुलतानीने घरात बॉम्ब टाकले होते. ती सतत चिडून घरात ड्रामा क्रिएट करत असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले. सना सुलतानीने अनेकदा अनिल कपूरवरही टीका केली होती. मात्र, ऐकेल ती सना सुलतान कुठली? एका यूजरने अदनान हा एलिमिशेनपासून सेफ होता तरीही तो घराबाहेर कसा गेला? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
संबंधित बातम्या