मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss OTT 3: पायल घराबाहेर पडताच कृतिकाचं सवतीबद्दल मोठं वक्तव्य! म्हणाली ‘जोपर्यंत ती इथे होती…’

Bigg Boss OTT 3: पायल घराबाहेर पडताच कृतिकाचं सवतीबद्दल मोठं वक्तव्य! म्हणाली ‘जोपर्यंत ती इथे होती…’

Jul 01, 2024 03:54 PM IST

‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरातून पायल मलिक एलिमिनेट झाली आहे. पायल बाहेर पडताच घरात तिच्याबद्दल बोलणी सुरू झाली आहेत. दरम्यान, एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, कृतिका पायलबद्दल बोलताना दिसली आह.

Bigg Boss OTT 3
Bigg Boss OTT 3

Bigg Boss OTT 3 Latest Update: सध्या अभिनेता अनिल कपूर होस्ट करत असलेला वादग्रस्त शो 'बिग बॉस ओटीटी ३' जसजसा पुढे सरकत आहे, तसतसा तो अधिकच रंजक बनत चालला आहे. शोमधील विजयामुळे प्रत्येकजण एकमेकांचे शत्रू बनत चालले आहेत. या घरात स्पर्धक एकमेकांचे मित्र असल्याचे नाटक करत असले, तरी जेव्हा नॉमिनेशनचा प्रश्न येतो, तेव्हा त्यांचा खरा चेहरा दिसू लागतो. वीकेंड वॉरमध्येही असंच काहीसं पाहायला मिळालं. शोच्या दुसऱ्या एलिमिनेशनमध्ये पायल मलिकला शोमधून बाहेर काढण्यात आलं. पायल मलिक हिला नेझीने नॉमिनेट केलं होतं. आता पायल बाहेर पडताच घरात तिच्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात अरमान, कृतिका आणि पॉलमी पायलबद्दल बोलताना दिसले आहेत.

पायल मलिक बाहेर गेल्यानंतर घरातील वातावरण अचानक बदलले. एकीकडे पायल घराबाहेर पडताच शोबद्दल बोलताना दिसत आहे. आता या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे, ज्यात अरमान मलिक, कृतिका आणि पॉलमी एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. यावेळी पॉलमी पायलबद्दल बोलताना म्हणते की, ‘जोपर्यंत ती घरात होती, तोपर्यंत तिने सगळ्यांना भरपूर खाऊ घातलं होतं. कोणीही उपाशी झोपणार नाही, याची काळजी तिने घेतली होती.’

Tharala Tar Mag: फाईलचं नेमकं सत्य काय? पूर्णा आजीच्या रागानंतर सुभेदारांच्या घराची दारं प्रियासाठी होणार बंद?

अरमान आणि कृतिका काय म्हणाले?

यानंतर अरमान मलिक म्हणतो की, ‘तिने नेहमीच सर्वांची काळजी घेतली आहे. समोरून येऊन ती सगळी कामं करत होती. ती स्वतः जेवण बनवायची, बाकी काम करू का विचारायची.’ यानंतर कृतिका म्हणते की, 'तिचं असंच आहे. ती घरी देखील अशीच वागते. सगळ्यांची खूप काळजी घेते.' यावर पौलमी म्हणते की, ‘मी पहिल्या दिवसापासून तिचा खूप आदर करते.’ याचाच अर्थ पायल घराबाहेर गेल्यानंतरही तिच्याबद्दल आपुलकीने बोललं जात आहे. तिने अल्पावधीतच सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहे. तिच्या नॉमिनेशनमुळे अनेक चाहते नाराज झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये कोण झालंय सहभागी?

बॉक्सर नीरज गोयत आणि पायल मलिक 'बिग बॉस ओटीटी ३'मधून बाहेर पडल्यानंतर आता सना मकबूल, साई केतन राव, पौलामी दास, अरमान मलिक, कृतिका मलिक, शिवानी कुमारी, सना सुलताना, दीपक चौरसिया, चंद्रिका दीक्षित, विशाल पांडे, लव कटारिया, रॅपर नेझी आणि मुनीषा खटवानी या शोमध्ये उरले आहेत.

WhatsApp channel