‘बिग बॉस ओटीटी ३’चा पहिला ‘वीकेंड का वार’ शनिवारी पार पडला होता. या सीझनमधील स्पर्धकांसाठीच नव्हे, तर अनिल कपूरसाठीही हा पहिला वीकेंड वॉर होता. यावेळी दीपक चौरसियाने सर्वप्रथम घरातील वातावरण आणि स्पर्धकांबद्दल एक रिपोर्ट वाचून दाखवला. यावेळी अनिल कपूरने रेशनच्या मुद्द्यावरून वाद घालण्यावरून सगळ्यांची चांगलीच शाळा घेतली. यावेळी अनिल कपूर याने विशाल पांडे आणि लुकेश कटारिया यांचे चांगलेच पाय खेचले.
यानंतर अनिलने सना मकबूलच्या कॉन्ट्रॅक्टबद्दलच्या वक्तव्यावर टोला लगावला आणि म्हणाला की, मी तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की ते तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे की नाही? तेव्हा सना म्हणाली की, सर तसे नाही. अनिल म्हणाला, ‘मला विचारायचं आहे की, सनाचा वेगळा कॉन्ट्रॅक्ट काय आहे आणि बाकीच्यांचा वेगळा आहे का? अनिल म्हणतो की, तुमच्या वक्तव्यावरून असं वाटत होतं की, ’मी वेगळी आहे, मी महत्त्वाची आहे, हे तुम्ही दाखवत आहात. माझा मुद्दा कसा वेगळा असेल असा प्लॅन होता असं वाटत होतं.'
यावेळी अनिलने लुकेशला सांगितले की, ‘आत्मविश्वास असणे चांगले आहे, पण अतिआत्मविश्वास नाही. बाहेर कोणीतरी आपल्याला साथ देत आहे असे तिला वाटते. तुमची स्टाईल आणि बोलण्याची पद्धत सारखीच दिसते, पण तुम्ही खरे असाल तर तुम्ही त्यापलीकडे जाऊ शकता असं मला वाटतं.’
त्यानंतर अनिल कुमार, शिवानी कुमारी आणि पौलामी दास यांच्याकडे वळला आणि शिवानीला प्रश्न विचारू लागला. त्यावेळी नक्की काय घडलं, हे देखील अनिल कपूरने विचारलं. शिवानी म्हणाली की, 'आम्ही दोघी ही जायला उभे होतो. मी म्हणाले की, मला जे हवं ते मी करेन. नंतर आम्ही दोघं पळून गेलो आणि आम्हा दोघांना पळून जायला लागलं. ती शिवीगाळ करत असल्याचं पाहून आम्ही ते काम करायला गेलो. आम्हाला राग आला. नंतर मला जाणवले की, आम्हाला जास्त वेदना होत आहेत.
यावर अनिल कपूर म्हणाला की, ‘शिवीगाळ हा मुद्दा नाही. पडल्यानंतर तुम्ही नॉर्मली आत गेलात आणि मग पौलामीला पाहिलं आणि मग तुम्हाला आठवलं की, दुखापत झाली आहे. यानंतर तुम्ही पुन्हा नॉर्मल झालात. परतीच्या वाटेवर ती पुन्हा नॉर्मल झाली आणि आत येताच ती लंगडी झाली.’
बिग बॉसने रणवीर आणि शिवानीला शिक्षा करण्याविषयी म्हटले. मग, शिक्षा करण्याची वेळ आली आणि शिवानीला पुन्हा वेदना आठवल्या. अनिलच्या बोलण्याशी सर्वजण सहमत झाले होते. शिवानीच्या माती खाण्यावरही अनिल कपूर म्हणाले की, मी मातीचा खूप आदर करतो, पण तू जी माती खात होतीस ती कुणाला दाखवण्यासाठी खात होतीस? यावर शिवानी म्हणाली की, ‘गावात माती खाणे सामान्य आहे.’ त्यावर अनिल म्हणाला की, शिवानीने लक्ष वेधण्यासाठी हे सर्व केले आहे, असे किती जणांना वाटते? यावर सना मकबूल आणि नेजी वगळता सगळेजण हो म्हणाले.
संबंधित बातम्या