Bigg Boss OTT 3 Latest Update: रिअॅलिटी टीव्ही शो ‘बिग बॉस ओटीटी ३' मधील दुसरी सर्वात मोठी लढाई लव कटारिया आणि सई केतव राव यांच्यात झाली आहे. मागील प्रकरणातून हा शो अद्याप पूर्णपणे सावरला नव्हता की, पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात हाणामारीचे प्रकरण घडताना पाहायला मिळत आहे. या भांडणाचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात लव कटारिया हाणामारी करताना दिसला आहे. यापूर्वी अरमान मलिक आणि विशाल पांडे यांच्यात भांडण झाले होते, ज्यात अरमानने विशालला थप्पड मारली होती. त्या भांडणात लवचाही महत्त्वाचा वाटा होता, पण यावेळी तो स्वत: या भांडणाचा भाग बनला आहे.
लव कटारिया आणि साई केतन राव सर्वांसोबत बसले असताना दोघांमध्ये वाद झाला. त्यांच्यातील वाद वाढला, तेव्हा साई केतन रावने लव कटारियाला असे काही म्हटले, जे त्याला आवडले नाही. यानंतर लव कटारियानेही साईला काही अपशब्द उच्चारले, ज्यावर तो संतापला आणि त्याला मारहाण करण्यासाठी त्याच्या दिशेने धावत गेला. मात्र, क्षणाचाही विलंब न लावता रणवीर शौरी धावत मध्ये आला, ज्यामुळे ही मोठी घटना टळली. मात्र, यानंतरही साई नियंत्रणात आला नाही. यानंतर बाकीच्या लोकांनीही त्याला रोखले. कृतिकाने त्याला समजावलं की, अरमानसारखी चूक करू नकोस. यानंतर साई रागाच्या भरात घरातील खुर्च्या फोडताना दिसला.
'बिग बॉस ओटीटी ३'मध्ये अदनान शेखच्या एन्ट्रीनंतर पारा सतत वाढत आहे आणि आता साई केतन राव आणि लव कटारिया यांच्यातील भांडण हाणामारीपर्यंत पोहोचण्याआधीच थांबवल्याने बिग बॉस याबाबत काही कारवाई करते का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण, यंदाच्या सीझनमध्ये ही दुसरी वेळ आहे, जेव्हा एखादे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलेले दिसत आहे. लव कटारिया आणि साई केतन राव यांचे सोशल मीडियावरही वेगवेगळे फॅन फॉलोइंग आहेत. काही लोक लवला बरोबर म्हणत आहेत, तर काही जण म्हणत आहेत की, साईने अगदी बरोबर केले.
‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये पहिली मोठी हाणामारी अरमान मलिक आणि विशाल पांडे यांच्यात झाली होती. खरं तर, विशाल पांडे गार्डन परिसरात बसून कृतिकाबद्दल अनेकदा काहीतरी कमेंट करताना दिसला होता, ज्यात लव कटारियाही सामील होता. पण, जेव्हा विशालने म्हटले की, त्याला भाभी सुंदर वाटते, तेव्हा ही परिस्थिती आणखी बिघडली. जेव्हा ही गोष्ट अरमानपर्यंत पोहोचली, तेव्हा त्याने विशालवर हात उचलला.
संबंधित बातम्या