Bigg Boss OTT 2 चा विजेता एल्विश यादव ईडीची नोटीस, सापाचे विष वापरल्यामुळे होणार चौकशी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss OTT 2 चा विजेता एल्विश यादव ईडीची नोटीस, सापाचे विष वापरल्यामुळे होणार चौकशी

Bigg Boss OTT 2 चा विजेता एल्विश यादव ईडीची नोटीस, सापाचे विष वापरल्यामुळे होणार चौकशी

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jul 11, 2024 08:46 AM IST

गेल्या काही दिवसांपासून Bigg Boss OTT 2 चा विजेता एल्विश यादव हा चर्चेत आहे. आता त्याच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. ईडीने एल्विशला नोटीस बजावली आहे.

Elvish Yadav
Elvish Yadav

यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी सिझन २ चा विजेता एल्विश यादव हा सतत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. एल्विश यादवने रेव्ह पार्टीत सापाचे विष वापरल्या प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून त्याची चौकशी सुरु होती. आता याच प्रकरणात ईडीने एल्विशला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. एकंदरीत एल्विशच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसू लागली आहे.

अंमलबजावणी संचालनालयानं (ED) यूट्यूबर सिद्धार्थ यादव उर्फ ​​एल्विश यादव याला २३ जुलै रोजी मनी लाँड्रिंग (Money Laundering Case) प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. एल्विशला लखनऊमध्ये चौकशीसाठी जावे लागणार आहे. यापूर्वी ८ जुलै रोजी ईडीने त्याला नोटीस बजावली होती. मात्र, एल्विश परदेशात असल्यामुळे त्याला या चौकशीसाठी हजर राहाता आले नाही. त्यामुळे आता पुन्हा त्याला नोटीस पाठवण्यात आली आहे.
वाचा : सत्यात न्याय मिळवून देणारे नाहीत; ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणावर उत्कर्ष शिंदेची संतप्त पोस्ट

काय आहे प्रकरण?

एल्विश यादवने रेव्ह पार्टीमध्ये नशा म्हणून सापाचा विषयाचा वापर केल्याने ईडीकडून चौकशी होत आहे. ईडीने या प्रकरणी मे महिन्यात गुन्हा दाखल केला होता. यानंतर, एल्विश आणि त्याच्याशी संबंधित लोकांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआर (FIR) आणि आरोपपत्राची दखल घेतल्यानंतर, नोएडा पोलिसांनी मनी लाँडरिंग (पीएमएलए) अंतर्गत आरोप दाखल केले.
वाचा : फास घेण्याची धमकी देत मराठी निर्माता शिवाजी पार्कात चढला झाडावर, काय आहे प्रकरण?

तीन वर्षांपूर्वी झाली रेव्ह पार्टी

रेव्ह पार्टीचे प्रकरण गेल्या वर्षी ३ नोव्हेंबरचे आहे. नोएडा सेक्टर ५१ मधील एका बँक्वेट हॉलमध्ये रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या पार्टीला एल्विश पार्टीला उपस्थित नव्हता. परंतु, एल्विश यानेच रेव्ह पार्टीत सापाच्या विषाची व्यवस्था करून दिली होती, असा आरोप करण्यात आला.
वाचा : कार्टून नेटवर्क बंद होणार? सोशल मीडियावरील या ट्रेंडमागचे सत्य काय?

'पीपल फॉर अॅनिमल्स'ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये या रेव्ह पार्टीत नऊ साप सापडले. नऊपैकी आठ सापांचे दात गायब असल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणात एल्विश यादवची चौकशी करण्यात आली. आता प्रकरणी चौकशीसाठी एल्विशला समन्स बजावण्यात आले आहे.
वाचा: दीपिकाचा 'कल्की 2898 एडी' पाहिल्यानंतर रणवीर सिंगने लावला डोक्याला हात, काय आहे कारण?

Whats_app_banner