Elvish Yadav: एल्विश यादवने युट्यूबर मॅक्सटर्नला केली बेदम मारहाण, पोलिसात तक्रार दाखल
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Elvish Yadav: एल्विश यादवने युट्यूबर मॅक्सटर्नला केली बेदम मारहाण, पोलिसात तक्रार दाखल

Elvish Yadav: एल्विश यादवने युट्यूबर मॅक्सटर्नला केली बेदम मारहाण, पोलिसात तक्रार दाखल

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Mar 09, 2024 10:35 AM IST

Elvish Yadav Video: सध्या सोशल मीडियावर एल्विशला अटक करण्याची मागणी केली जात आहे.

Elvish Yadav Video
Elvish Yadav Video

Bigg Boss Ott 2 Winner Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी २चा विजेता एल्विश यादव सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे ड्रग्स प्रकरणात नाव आले होते. ते ऐकून चाहत्यांना धक्काच बसला होता. त्यानंतर त्याला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला होता. आता एल्विनशने युट्यूबरला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एल्विशविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

एल्विशने गुरुग्राममध्ये राहणाऱ्या लोकप्रिय युट्यूबर सागर ठाकूर उर्फ मॅक्सटर्नला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. अलीकडेच युट्यूबर मॅक्सटर्नने सोशल मीडियावर एल्विश यादवने मारहाण केल्याचा व जीवे मारण्याची धमकी दिल्या आरोप केला होता. पण यावर कोणाचाही विश्वास बसला नाही. त्यामुळे मॅक्सटर्नने आता मारहाण करतानाचा सीसीटीव्ही फुटेज शेअर केला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.
वाचा: 'चला हवा येऊ द्या'घेणार प्रेक्षकांचा निरोप! कधी असणार शेवटचा एपिसोड?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत, एल्विश आपल्या ८ ते १० मित्रांना घेऊन मॅक्सटर्नकडे पोहोचून, त्याला बेदम मारहाण करताना दिसत आहे. या मारहाणामुळे मॅक्सटर्न जखमी झाला आहे, याचा दखील व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. या व्हिडीओनंतर ‘एक्स’वर एल्विशला ट्रोल केले जात आहे. गुंडा असा हॅशटॅग सध्या ट्रेंड होत आहे. नेटकरी एल्विशविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहे. पण हे नेमकं प्रकरण काय आहे?  जाणून घ्या..
वाचा: काजल अग्रवालसोबत चाहत्याचे गैरवर्तन, व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी एल्विश यादव व मुनव्वर फारुकी एका क्रिकेट सामन्यात एकत्र दिसले होते. यावरून मॅक्सटर्नने एल्विशची खिल्ली उडवली होती. मॅक्सटर्नने ‘एक्स’वर एल्विश व मुनव्वरचे अनेक व्हिडीओ, फोटो पोस्ट करून ‘बिग बॉस ओटीटी २’च्या विजेत्या विरोधात बोलत होता. यामुळेच एल्विश भडकला. एवढंच नाही तर काही नेटकऱ्यांनी एल्विशवर अशी टीका केली की, तो स्वतःला रामभक्त, सनातनी म्हणतो आणि हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या मुनव्वरबरोबर फिरतो. हाच वाद आता टोकाला गेला.

काही दिवसांपूर्वी त्याचा जयपूरमधील एका रेस्टॉरंटमधला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एल्विश एका व्यक्तीला जोरात कानशिलात लगावताना दिसला होता. त्यानंतर आता हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.  एल्विशच्या अटकेची मागणी होत आहे.

Whats_app_banner