छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन सुरु होऊन ४८ दिवस उलटले आहेत. हा शो पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. बिग बॉस मराठी शोचा आता सहावा आठवडा सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात सदस्यांची चांगलीच झोप उडाली. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी सगळ्या स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली होती. या आठवड्यातही काही वेगळे घडलेले नाही. दरम्यान, एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सूरजला जर तू अरबाजच्या जागी असता तर असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता, सूरज, आर्या, अभिजीत आणि पॅडी दादा गप्पा मारताना दिसत आहेत. अंकिता म्हणते, 'जर अरबाजच्या जागी पॅडी दादा असते तर? पॅडी दादांनी काय केलं असतं.' त्यावर पॅडी दादा लगेच उत्तर देतात, 'दोन दिवसात ब्रेकअप झाला असता.' ते ऐकून सर्वांना हसू अनावर होते.
पुढे व्हिडीओमध्ये अभिजीत सावंतला देखील सेम प्रश्न विचारण्यात येतो. त्यावर अभिजीत, 'जर मी तिथे असतो तर मी आयुष्यातच नसतो' असे उत्तर देतो. ते ऐकून आर्या आणि अंकिताला हसू येते. त्यानंतर सूरजला देखील सेम प्रश्न विचारण्यात येतो. पण सूरजने दिलेले उत्तर ऐकून तुम्ही लोटपोट व्हाल. 'हे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. हे घे तुझ्यासाठी स्पेशल चॉकलेट. माझ्या बच्चाा....' असे सूरज म्हणतो. ते ऐकून पॅडी दादा आणि अभिजीतला हसू अनावर होते.
सोशल मीडिया सूरजचा हा मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडीओपाहून मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने 'सूरज हा एपिक आहे' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'स्पेशल चॉकलेट बच्चा' अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने, 'वाह सूरज मस्तच' असे म्हटले आहे. सोशल मीडियावर सूरज चव्हाण धुमाकूळ घालताना दिसत आहे.
वाचा: २ शर्ट आणि तुटलेली चप्पल घालून शोसाठी आलेल्या सूरज चव्हाणकडे डिझायनर कपडे कसे?
सध्या सगळीकडे बिग बॉस मराठी सिझन पाचमधील स्पर्धक सूरज चव्हाणची हवा पाहायला मिळते. तो घरातील स्पर्धकांसोबत मिळून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का सूरज जेव्हा बिग बॉस मराठी शोमध्ये सहभागी होण्यासाठी आला तेव्हा केवळ दोन टी-शर्ट आणि पायात तुटलेली चप्पल घालून आला होता. त्याला सेटवर आल्यावर कपडे देण्यात आले होते. आता घरात सूरज इतर स्पर्धकांप्रमाणे डिझायनर कपडे घालत आहे. भाऊच्या धक्क्यावर देखील सूरजच्या कपड्यांची प्रशंसा होत आहे.