गर्दी जमवणारा, सभा गाजवणारा, व्यासपीठावरुन भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीची म्हणजेच घन:श्याम दरवडेची 'बिग बॉस मराठी'च्या घरात एण्ट्री झाल्याने सर्वजण चकीत झाले. पहिल्या दिवसापासून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरात छोटा पुढारी घन:श्याम दरवडेसोबत घरातील सदस्य कसेही वागत असले तरी तो त्यांच्याशी प्रेमानेच वागताना दिसत आहे. पण आता घरातील स्पर्धक निक्की तांबोळीने थेट छोट्या पुढारीची पप्पी घेतली आहे.
घन:श्याम दरवडेच्या प्रत्येक स्टेटमेंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असतो. आपली मतं रोखठोक मांडणारा, मोठमोठ्या नेत्यांना चॅलेंज देणाऱ्या या पुढाऱ्याने घरातील सर्व सदस्यांनाही आपलेस केले आहे. पण आता एका वेगळ्या कारणासाठी छोटा पुढारी चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील एक टास्क झाल्यानंतर निक्की तांबोळीने थेट घनशामची पप्पी घेतली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
कलर्स मराठी वाहिनीने नुकताच बिग बॉसच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये घन:श्याम इरिनाला म्हणतोय,"तू माझ्याशी कसंही वाग...पण मी तुझ्यासोबत प्रेमानेच वागणार." त्यानंतर आज बिग बॉसच्या घरात पार पडणारा टास्क दाखवण्यात आला आहे. हे सगळं दाखवत असताना निक्की तांबोळी घन:शामच्या शेजारी बसलेली दिसत आहे. तिने थेट त्याच्या गालावर पप्पी घेतली आहे. हा प्रोमो शेअर करत कलर्स मराठी वाहिनीने, 'त्याच्याशी कसेही वागा पण छोटा पुढारी मात्र सगळ्यांशी प्रेमानेच वागणार!' असे कॅप्शन दिले आहे.
सोशल मीडियावर घन:शामची पप्पी घेतानाचा निक्कीचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेता पुष्कर जोगने 'बापरे' अशी कमेंट केली आहे. तसेच एका नेटकऱ्याने 'आता मी बाहेर यायला मोकळा' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'अरे येड्या ताई बोलतो ना तिला' असे म्हटले आहे.
वाचा: जॉन अब्राहमनं घेतली ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकर हिची भेट! फोटो पाहून नेटकरी संतापले, काय आहे कारण?
'बिग बॉस मराठी'च्या घरात आज टीव्ही टास्क पार पडणार आहे. बिग बॉस टीव्ही चॅनलवर घरातील सदस्य धमाकेदार परफॉर्मन्स सादर करताना दिसणार आहेत. घन:श्याम हे सर्व परफॉर्मन्सचं परिक्षण करताना दिसणार आहे. त्यामुळे आजचा भाग खूपच रंजक असणार आहे.