Bigg Boss Marathi Update Day 25: छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो 'बिग बॉस मराठी'चा सिझन पाचवा सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. रोज काही तरी नवा ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तसेच घरातील स्पर्धक देखील काही ना काही रोज नवा ड्रामा करताना दिसतात. अशातच आज बिग बॉसच्या घरात रक्षाबंधन हा सण साजरा होणार आहे. निक्कीच्या सख्ख्या भावाचे करोना काळात निधन झाले. त्यामुळे तिने बिग बॉसच्या घरात सूरजला भाऊ मानले आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरात जोरदार रक्षाबंधन सेलिब्रशन होत आहे. घरातील सदस्य एकमेकांना राखी बांधताना दिसत आहेत. छोटा पुढारीने निक्कीला आपल्या बहिणीचा दर्जा दिला होता. पण त्यांच्या नात्यामध्ये फूट पडते. दोघांमध्ये जोरदार भांडण होते. आता आजच्या भागात निक्की सूरजला राखी बांधताना दिसणार आहे. निक्कीआधी सूरजला जान्हवी आणि 'अबीर गुलाल' मालिकेतील श्रीने राखी बांधली होती.
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात निक्की सूरजला राखी बांधताना दिसणार आहे. सूरजला राखी बांधत निक्की म्हणते,"बिग बॉस मराठी'च्या घरात जेवढे दिवस आपण एकत्र आहोत त्याच्यासोबतच बाहेरच्या जगातदेखील मी तुझं रक्षण करेल." त्यावर सूरज म्हणतो, "मी तुझी बाहेरच्या जगात रक्षा करेन." निक्की पुढे म्हणते,"मी जिवंत असेपर्यंत तुला काही कमी जाणवणार नाही. तुला कधीही माझी आठवण आली तर फक्त एक कॉल कर. मी शुटिंग सोडून पळत येईन. तुझ्यासाठी मी कायम हजर असेल... नेहमी आनंदी राहा.." त्यानंतर अंकिता डीपी दादाला राखी बांधते. तर दुसरीकडे इरिनाला आपल्या भावाची आठवण येते आणि तिचे डोळे पाणावतात. अरबाजकडे इरिना आपल्या मनातील भावना व्यक्त करते.
वाचा: रक्षाबंधनाच्या दिवशी भावा बहिणीच्या नात्यात पडली फूट; निक्की अन् छोटा पुढारीमध्ये मोठा वाद
अंकिता ने 'जळतात मेले' लिहिलेलं टी- शर्ट परिधान केलं आहे. त्यामुळे कॅमेऱ्याकडे पाहून डीपी दादा म्हणतो,"मी कोल्हापूरातून आलोय. लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करायला मी इथे आलोय. पण माझ्याकडे काम काय कोण रडलं तर त्यांना हसवा. त्यानंतर 'बिग बॉस' अंकिताला विचारतात,"अंकिता तुमच्या टी-शर्टवर काय लिहिलंय?". त्यावर अंकिता म्हणते,"जळतात मेले". बिग बॉस म्हणतात,"धनंजय यांचे तेच होतंय."