Bigg Boss Marathi Day 53 : दिवसेंदिवस छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस मराठी' हा शो रंजक ठरत आहे. कधी कुणाचा गेम बदलेल आणि कधी कोण घराबाहेर जाईल हे सांगू शकत नाही. रोज बिग बॉसच्या घरात काही तरी नवे राडे होताना दिसतात. तसेच घरातील स्पर्धक हे टास्कमध्ये देखील धमाल करत असतात. या आठवड्यात घरात जंगल राज असणार आहे. ५० दिवस उलटल्यानंतरही टास्कमध्ये सदस्य तेवढीच मजा करताना दिसत आहेत. त्यामुळे टास्क आणखी रंगतदार होणार आहे. आजच्या भागातील टास्कमध्ये सूरजला प्राणी ओळू न आल्यामुळे दमछाक झालेली पाहायला मिळाली.
कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'बिग बॉस मराठी'च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये घरातील स्पर्धक बिबी करंसी टास्क खेळताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये, अंकिता सूरजला पाणगेंड्याची अॅक्टिंग करुन दाखवत आहे. तर सूरजला ती कोणत्या प्राण्याची अॅक्टिंग करतेय हे ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. सूरजने गेंडा बरोबर ओळखला आहे. पण पाणगेंडा ओळखण्यात त्याची झालेली पंजायत पाहून प्रेक्षकांना मात्र मजा येईल. सोशल मीडियावर त्यांच्या या टास्कचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
व्हिडीओमध्ये सूरजने पाणगेंडा ऐवजी फक्त गेंडा म्हटल्याने अभिजीत म्हणतोय,"पूर्ण केलं नाही अजून." त्यावर हताश सूरज म्हणतोय,"काहीच कळत नाही आहे. ओळखलाय पण पाण्यातला गेंडा माहिती नाही." बी बी करन्सी मिळवण्याचा हा टास्क मात्र खूपच मजेदार आहे. संपूर्ण घराने एकत्रित किती बी बी करन्सी कमावली हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग नक्की पाहा.
वाचा: अभिजीत सावंतने केली शाहरुख खानची नक्कल, वर्षा उसगावकरांनी केले कौतुक
बिग बॉस मराठीच्या घरात नुकताच नॉमिनेश टास्क पार पडला. या टास्कमध्ये वर्षा उसगावकर, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक नॉमिनेट झाले. आता भाऊच्या धक्क्यावर कोणता स्पर्धक बाहेर पडणार हे लवकरच कळेल.