‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय शोच्या सिझन ५ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या सिझनचा छोट्या खेडे गावातून आलेला सूरज चव्हाण विजेता ठरला. त्याच्या साधेपणाने संपूर्ण प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बिग बॉसच्या घरात असताना सूरजने एक इच्छा व्यक्त केली होती. त्याला स्वप्नातील घर बंधायचे होते. आता सूरजचे स्वप्न सत्यात उतरले आहे. त्याच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. सूरजच्या घराचा भूमिपूजन सोहळा पार पडला आहे.
मूळचा बारामतीचा असलेला सूरज सध्या ‘बिग बॉस’नंतर त्याच्या गावी कुटुंबासह आहे. पण सूरजचे घर हे एक खोलीचे आहे. तो एकटा या घरात राहातो. त्याच्या छोट्याशा घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता सूरजच्या नव्या घराचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. त्याचे हे घर बांधण्यासाठू सूरजची बिग बॉसमधील सह कलाकार अंकिता वालावलकरने देखील मदत केली आहे. आता अखेर सूरज चव्हाणच्या हक्काच्या घराचं स्वप्न आता पुर्णत्वास येत आहे. काल त्यांच्याकडे भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. याचा व्हिडीओ सूरजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट केला आहे.
२७ ऑक्टोबर रोजी सूरजच्या घराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. या सोहळ्याला गावकऱ्यांनी हजेरी लावली. तर दुसरीकडे त्याच्या राहत्या घरात विज जोडण्याचे कामही सुरु होते. सूरजच्या घरात वीज पुरवठा होत नव्हता त्यामुळे स्थानिक माध्यमांनी याबाबतची दखल घेतली. वीजपुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत कधीही सूरज चव्हाणने वीज मागणी केली नव्हती. मात्र बारामतीचे तहसीलदार, व वीज विकास अधिकारी गावात आले चर्चा झाली आणि मग सूरजचा अर्ज घेतल्यानंतर त्याच्या घरात विजेचा पुरवठा सुरु करण्यात आला. त्यामुळे काल अधिकृतरित्या सूरज चव्हाणच्या घरात वीज आली.
वाचा: भाजपच्या 'या' माजी महिला खासदाराने साकारली होती अशोक सराफ यांच्या मुलीची भूमिका
अंकिताने सूरजच्या घराबाबतही अपडेट दिली आहे. व्हिडीओ शेअर करत अंकिता म्हणाली, “आज सूरजच्या घराचं काम सुरु होतंय. मला आमंत्रण देण्यात आलं होतं. माझं आणि सूरजचं बोलणं झालं. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर मी बरेच दिवस घरी आले नव्हते, इतकंच नाही तर इथून मला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना सुद्धा मला भेटायचं आहे. ज्या लोकांनी माझ्यासाठी मेहनत घेतली त्या लोकांना वेळात वेळ काढून मी भेटत आहे. त्यामुळे मी इथून मुंबईत जाईन आणि मग मुंबईहून सूरजच्या गावी जाणार आहे. सूरजचं आणि माझं बोलणं झालं तो खूप खुश आहे”.
संबंधित बातम्या