Bigg Boss Marathi Day 43 : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सिझनची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. दुसऱ्या आठवड्यापासूनच या सीझनमध्ये कोण वाईल्ड कार्ड सदस्य सहभागी होणार याकडे बिग बॉसप्रेमींचं लक्ष लागलं होतं. वाईल्ड कार्ड सदस्याबद्दल अनेक नावे समोर आली. आता बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात खरच वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार का? घरात कोण सदस्य येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. याबाबात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो सर्वांनाच विचार करायला भाग पाडणारा आहे. प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की एक अभिनेता उभा आहे. त्याची बॉडी उत्कृष्ट आहे. तसेच तो उंच देखील आहे. या प्रोमोमध्ये बॅकग्राऊंडला 'तो आहे मर्द रांगडा आणि मनाचा राजा...अस्सल फौलाद घालणार 'बिग बॉस'च्या घरात राडा' असे म्हटल्याचे ऐकू येत आहे. त्यामुळे अरबाज, वैभवला टक्कर देणारा हा नवा सदस्य कोण? या प्रश्नाचं कोडं आज सुटणार आहे.
गेल्या आठवड्यात बी बी करन्सीसाठी आणि बी बी फार्ममध्ये सदस्यांनी घातलेला राडा, नियमांचं उल्लंघनाबद्दल रितेश भाऊने सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. त्यानंतर घरात वाईल्ड कार्ड एण्ट्री होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून घरातील सदस्य देखील वाईल्ड कार्ड एण्ट्रीची वाट पाहात होते. आता ही एण्ट्री झाली आहे. या नव्या सदस्याच्या येण्याने बिग बॉसच्या घरात काय बदल घडणार हे पाहण्यासाठी सर्वच प्रेक्षक उत्सुक आहेत.
वाचा: 'संपूर्ण आठवडा घासणार भांडी', रितेश देशमुखने निक्कीला दिली खतरनाक शिक्षा
बिग बॉस मराठीमधील सहावा आठवडा सुरु झालाय. या सहाव्या आठवड्यात छोटा पुढारीम्हणून ओळख असणाऱ्या घन:श्याम दरवडेला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या आठवड्यात एकूण सात जण नॉमिनेशनमध्ये होते. यात घन:श्याम सोबत आणखी सात सदस्यांवर बाहेर जाण्याची टांगती तलवार होती. घनश्याम दरोडेसह, आर्या जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत हे सात सदस्य या आठवड्यात नॉमिनेट होते. त्यापैकी घनःश्याम दरवडेचा बिग बॉसमधील प्रवास संपला. आता घरातील वाईल्ड कार्ड एण्ट्री सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.