Bigg Boss marathi Season 5 Update: 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमधील स्पर्धक सर्वांचे लक्ष वेधताना दिसत आहेत. कलाकारांसोबतच या शोमध्ये काही किएटर्स देखील सहभागी झाले आहेत. त्यामधील सूरज चव्हाण हा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. एकदम छोट्या गावातून आलेले, दुनियादारी फारशी माहिती नसली तरी माणसं समजणाऱ्या सूरजने बिग बॉसच्या घरात धूमाकूळ घातला आहे. घराच प्रत्येक टास्कमध्ये स्पर्धक अरबाजची ताकदत पाहून त्याच्याची भीडताना घाबरतात. पण सूरज मात्र थेट त्याला भिडला आहे.
'बिग बॉस मराठी'चा आजच्या भागाचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये किएटर्स हे कलाकारांवर भारी पडताना दिसत आहेत. यातीलच एक सर्वांच्या ओळखीचा चेहरा म्हणजे गोलीगत सूरज चव्हाण. या प्रोमोने सर्वांनाच थक्क केले आहे. सूरज चव्हाणचा गोलीगत पॅटर्न या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये "माझे मी बघेन", म्हणत निक्की, अरबाज आणि जान्हवी या तगड्या सदस्यांसोबत सूरज चांगलाच भिडताना दिसत आहे.
सूरज चव्हाण आता आपले खरे रंग दाखवताना दिसत आहे. सुरुवातीपासूनच त्याला चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा आहे. चेहऱ्यावर हसू ठेवणाऱ्या सूरजच्या वैयक्तिक आयुष्यात बरंच काही घडून गेलंय. बिग बॉस मराठीच्या घरात अनेकदा तो याबद्दल भाष्य करताना दिसत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर सूरजचं चांगलच कौतुक होत आहे. आता सूरज टास्कमध्ये नेमकं काय करतो हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
Stree 2 Review: हॉरर आणि कॉमेडीचा डबल डोस! तिकिट बूक करण्यापूर्वी वाचा 'स्त्री २'चा रिव्ह्यू
सध्या बिग बॉसच्या घरात कॅप्टनसी टास्क सुरु आहे. या टास्कमध्ये सूरज, अरबाज, निक्की, जान्हवी आणि निखिल सहभागी झाले आहेत. टास्कमध्ये स्पर्धकांना दिलेले फ्रेंच फ्राईज सांभाळायचे आहेत. त्यामध्ये सूरज खूप चिडतो आणि अरबाजशी भिडतो. आता नेमके काय झाले हे पाहण्यासाठी आजचा भाग पाहावा लागणार आहे.
सूरज चव्हाणने 'टिक टॉक'च्या पहिल्या दहात स्थान मिळवले होते. त्याचा गुलिगत हा डायलॉग तुफान चर्चेत असायचा. त्याला बिग बॉसच्या घरात पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. सूरजचे आता इन्स्टाग्राम अकाऊंटवर ९ लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तो मूळचा बारामतीचा आहे.