Bigg Boss Marathi Season 5 Day 26 : बिग बॉस मराठी सिझन ५ सुरु झाल्यापासूनच सर्वांची मने जिंकताना दिसत आहे. या शोमध्ये आपण पहिल्या दिवसापासूनच पाहिले की घरातील स्पर्धक निक्की तांबोळी भाईगिरी करताना दिसत आहे. तिच्या मनाला वाटेल तेव्हा ती काम करणार, तिला नाही वाटलं तर ती काम नाही करणार हे वागणे पाहून सर्वांनी संताप व्यक्त केला होता. आता सूरजने निक्कीच्या विरोधात आवाज उठवायाचा निर्णय घेतला आहे.
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होऊन २५ दिवस पूर्ण झाले आहेत. सीझन सुरू झाल्यापासूनचा प्रत्येक दिवस हा खूप खास आहे. प्रत्येक सदस्याने आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. गोलीगत सूरज चव्हाण सुरुवातीला खूप शांत होता. पण आता हळूहळू त्याला 'बिग बॉस मराठी'चा खेळ कळू लागला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात जिथे चुकीचं होणार तिथे सूरज चव्हाण उभा राहणार आहे.
कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सूरज चव्हाण अभिजीत सावंत आणि आर्या जाधव एकत्र बसून बोलताना दिसत आहेत. दरम्यान, सूरज आर्याला म्हणत आहे, "जिथे अत्याचार होणार तिथे सूरज चव्हाण उभा राहणार... बोलत नाहीना म्हणून ते असा गरीबांचा फायदा घेतात. निक्कीने केलं की आपण ते सहन करायचं? आणि तेच आर्याने केलं तर? आपल्या ग्रुपमधलं कोणीही असो त्याला पाठिंबा द्यायचा म्हणजे द्यायचा..तू नड." आता बिग बॉसच्या घरात आर्याचे जेव्हा निक्कीशी भांडण होणार तेव्हा सूरज काय स्टँड घेणार हे पाहण्यासाठी सर्वजण आतूर आहेत.
वाचा: 'बिग बॉस मराठी' फेम सुरज चव्हाणचा गोलीगत दणका! 'राजाराणी' चित्रपटातून गाजवणार मोठा पडदा
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात अरबाज पटेल आणि अंकिता यांच्यामध्ये देखील चांगले संभाशण होताना दिसत आहे. अरबाज अंकिताला सांगत आहे की, “बिग बॉस' खतरनाक आहेत. माझ्या कॅप्टनसीमध्ये डिलेमा दिलाय त्यांनी. कॅप्टनसी बरोबर सुरू होती. इम्युनिटी हा सर्वात मोठा प्रश्न होता. या इंडस्ट्रीत मी नवीन आहे.” त्यावर अंकिता म्हणते, "मला प्रामाणिकपणे तुझा खेळ वीक वाटत नाही. मला वैभवचा खेळ वीक वाटतो."