छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन सुरु होऊन ३६ दिवस उलटले आहेत. हा शो पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. बिग बॉस मराठी शोचा आता सहावा आठवडा सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात सदस्यांची चांगलीच झोप उडाली. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी सगळ्या स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली होती. आता हा आठवडा कसा रंगणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सूरज हा अरबाजची नक्कल करत आहे.
कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेला 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो पाहून बिग बॉस प्रेमींच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल. प्रोमोमध्ये डीपी दादा वैभवची भूमिका साकारत आहेत, जान्हवी किल्लेलकर निक्कीची तर सूरज हा अरबाजच्या भूमिकेत दिसत आहे. तिघेही आपली भूमिका उत्तम वठवत आहेत. सूरज साकारत असलेली अरबाजची भूमिका प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. तिघांचा अभिनय पाहताना प्रेक्षकांना मात्र हसू अनावर होणार आहे.
या आठवड्यात बिग बॉसच्या घरात वर्षा उसगावकर, अंकिता वालावलकर, अभिजित सावंत आणि निक्की तांबोळी हे स्पर्धक नॉमिनेट झाले होते. अभिजीत आणि निक्कीला सर्वात जास्त मत मिळाले म्हणून ते दोघे सेफ होते. शेवटी वर्षा ताई आणि अंकितामधून अंकिताला घराबाहेर जावे लागले होते. पण या आठवड्यात नॉमिनेशन नसल्यामुळे अंकिता देखील सेफ होती. रितेश देशमुखने घरातील स्पर्धकांसोबत हा प्रँक केला होता.
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाणने केला जान्हवीसोबत ‘झापूक झूपूक’ डान्स, पाहा खास व्हिडीओ
'बिग बॉस मराठी'च्या या आठवड्यात सदस्यांसमोर कोणते नवे आव्हान उभे ठाकणार? सदस्य यातून कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचच लक्ष लागले आहे. सहाव्या आठवड्यात नक्की काय घडणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. या आठवड्यात वर्षा उसगावकर या घराच्या कॅप्टन बनल्या आहेत. त्यामुळे त्या सेफ झाल्या आहेत. आता आगामी भागात काय घडणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
छोट्याशा खेडेगावातून आलेल्या सुरजने झगमगाटीच्या दुनियेत स्वतःचं असं स्थान स्वतः मिळवलं. सध्या 'बिग बॉस मराठी ५'मुळे सुरज भलतात चर्चेत आलेला पाहायला मिळतोय. रियॅलिटी शोद्वारे सुरज जरी आता प्रेक्षकांच्या भेटीला आला असला, तरी तो आता मोठ्या पडद्यावर ही झळकण्यास सज्ज होताना पाहायला मिळणार आहे. लवकरच सुरज त्याच्या आगामी 'राजाराणी' या चित्रपटातून मोठा पडदा गाजवताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच 'राजाराणी' या चित्रपटाच्या पोस्टरने साऱ्यांचीच मनं जिंकली होती. आता या सत्य घटनेवर आधारित एक प्रेमकथा उलगडणार्या या चित्रपटात सुरज महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात मुख्य कलाकाराच्या दोस्ताच्या भूमिकेत सुरजला पाहणं फारच रंजक ठरणार आहे. सुरजचा 'राजाराणी' हा चित्रपट १८ ऑक्टोबर २०२४ पासून जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.