बिग बॉस मराठी सिझन ५ सुरु झाल्यापासूनच सर्वांची मने जिंकताना दिसत आहे. या शोमध्ये आपण पहिल्या दिवसापासूनच पाहिले की घरातील स्पर्धक निक्की तांबोळी भाईगिरी करताना दिसत आहे. तसेच साधासरळ स्पर्धक सूरज चव्हाण देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. सूरजच्या साधेभोळेपणा प्रेक्षकांना आवडत आहे. सूरज हा त्याच्या 'झापूक झूपूक' स्टाइलसाठी विशेष ओळखला जातो. आता बिग बॉगच्या घरात त्याने यावर डान्स केला आहे.
'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. पाचवा आठवडा सरत आला आणि आता सदस्यांचे खरे चेहरे दिसू लागले आहेत. आज भाऊच्या धक्क्यावर सदस्य वेगवेगळ्या गाण्यांवर थिरकताना दिसणार आहेत. सूरजची झापुक झुपक स्टाईल आणि जान्हवीचा दिलखेच अंदाज पाहायला मिळणार आहे. त्या दोघांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. चला पाहूया व्हिडीओ...
छोट्याशा खेडेगावातून आलेल्या सुरजने झगमगाटीच्या दुनियेत स्वतःचं असं स्थान स्वतः मिळवलं. सध्या 'बिग बॉस मराठी ५'मुळे सुरज भलतात चर्चेत आलेला पाहायला मिळतोय. रियॅलिटी शोद्वारे सुरज जरी आता प्रेक्षकांच्या भेटीला आला असला, तरी तो आता मोठ्या पडद्यावर ही झळकण्यास सज्ज होताना पाहायला मिळणार आहे. लवकरच सुरज त्याच्या आगामी 'राजाराणी' या चित्रपटातून मोठा पडदा गाजवताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच 'राजाराणी' या चित्रपटाच्या पोस्टरने साऱ्यांचीच मनं जिंकली होती. आता या सत्य घटनेवर आधारित एक प्रेमकथा उलगडणार्या या चित्रपटात सुरज महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात मुख्य कलाकाराच्या दोस्ताच्या भूमिकेत सुरजला पाहणं फारच रंजक ठरणार आहे. सुरजचा 'राजाराणी' हा चित्रपट १८ ऑक्टोबर २०२४ पासून जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
वाचा: 'गुलिगत' सूरज चव्हाणचे एका दिवसाचे मानधन ऐकून कलाकारांना धक्का, वाचा रिल स्टारच्या मानधनाविषयी
टिक टॉक या अॅपने सूरजला प्रसिद्धी मिळवून दिली होती. तो टिक टॉक वरील टॉप व्हिडीओ क्रिएटर्सपैकी एक होता. तो चांगले पैसे कमावत होता. तसेच प्रसिद्ध असल्यामुळे त्याला अनेक कार्यक्रमांना देखील बोलावण्यात येत होते. स्पर्धकांशी गप्पा मारत असताना सूरजने सांगितले की त्यावेळी तो फक्त एखाद्या उद्घाटन सोहळ्याला जाण्यासाठी ८० हजार रुपये घ्यायचा. पण अनेक जवळच्या लोकांनी त्याची फसवणूक देखील केली. आता सूरज एका दिवसाचे ३० ते ४० हजार रुपये घेतो. ते ऐकून तेथे बसलेल्या स्पर्धकांच्या भुवया उंचावल्या.