'बिग बॉस मराठी' हा छोट्या पडद्यावरील रिअॅलीटी शो सर्वांचे चांगले मनोरंजन करत आहे. या शोने टीआरपीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या शोमधील दर शनिवारची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. कारण भाऊच्या धक्क्यावर महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसतो. आज "आम्ही आतमध्ये वैभव पाठवलाय गद्दार म्हणून बाहेर पडू नका", असे म्हणत भाऊच्या धक्क्यावर रितेश वैभव चव्हाणची शाळा घेताना दिसणार आहे.
कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉस मराठीच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये भाऊच्या धक्क्यावर काय घडणार याची झलक दाखवण्यात आली आहे. कॅप्टनसी कार्यात वैभव चव्हाण हा दुसऱ्या टीममध्ये असूनही त्याच्या मित्र मैत्रींना पाठिंबा देतो. ते पाहून सर्वांनीच संताप व्यक्त केला होता. आता रितेशने यावरुन वैभवला चांगलेच सुनावले आहे.
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात रितेश म्हणतोय,"बॉर्डरवरचा सैनिक समोरच्या सैनिकावर गोळ्या झाडण्यापेक्षा आपल्या सैनिकावर गोळ्या झाडतो याला काय म्हणतात?" त्यावर घरातील सदस्य फितूर, शत्रू, धोकेबाज, गद्दार असं म्हणतात. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या टास्कमध्ये वैभवने गद्दारी केलेली दिसून आली आहे. त्यामुळे रितेशने त्याची चांगलीच हजेरी घेतली आहे.
वाचा: सूरजच्या गोलीगत पॅटर्नची बातच न्यारी! बिग बॉसच्या घरातील टास्कमध्ये थेट अरबाजशी भिडला
रितेश वैभवला म्हणतो,"बोलायला जिगर लागते. ही जिगर बाजारात प्रोटीनच्या डब्ब्यात मिळत नाही. ही जिगर तुमच्यात दिसत नाही. इथून पुढे तुमच्यावर कोणी विश्वास का ठेवायचा. तुमच्या आत आहे तेच बाहेर दिसणार आहे. प्रेक्षकांच्या नजरेत तुमचा गेम ओव्हर झालाय..मला बघायचंय ही मैत्री कधीपर्यंत टिकते. आम्ही आतमध्ये वैभव पाठवलंय गद्दार म्हणून बाहेर पडू नका"
महाराष्ट्राच्या मातीतला बारामतीचा रांगडा गडी म्हणजेच अभिनेता वैभव चव्हाण. वैभव चव्हाणने आपल्या कातिल लूकने सर्वांनाच घायाळ केले आहे. लढवैया, बिनधास्त आणि जिद्दी व्यक्तिमत्त्व असणारा वैभव 'बिग बॉस मराठी'चा खेळ खेळताना दिसत आहे. पण त्याचा खेळ हा प्रेक्षकांना फारसा आवडत नसल्याचे चित्र आहे. तो सर्वकाही पणाला लावून खेळत खेळत नसल्याचे स्पर्धकांचे म्हणणे आहे.