छोट्या पडद्यावर सुरु असलेला बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन चांगलाच गाजत आहे. घरात सहभागी झालेले स्पर्धक आणि इन्फ्लूएंसर प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहेत. पण काही वेळा शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक मराठी इंडस्ट्रीची अनेक दशके गाजवणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा अपमान करताना दिसत आहेत. हा अपमान पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. निक्की तांबोळीनंतर आता जान्हवी किल्लेकर वर्षा यांना मिळालेल्या पुरस्कारांवर प्रश्न चिन्ह उपस्थित करते.
वर्षा उसगावकर आणि जान्हवी यांच्या मध्ये कडाक्याचे भांडण झाले. तेव्हा वर्षा या जान्हवीला कळसूत्री बाहुली असे संबोधतात. ते ऐकून जान्हवी आणखी चिडते ती वर्षा यांना धमकी देते, 'ताई तुम्ही माझ्या नादी लागू नका. मी तुमचा आदर ठेवून बोलते. माझ तोंड खोलू नका, माझ्या नादी लागू नको.' त्यावर वर्षा या लगेच कालचा एक विषय काढतात. जान्हवीला तिचा राग अनवार होतो. ती इथेच थांबत नाही. ती वाटेल तसे बोलते.
वर्षा या जान्हवीला माझ्या नादी लागायचे नाही असे काय बोलत होतीस? विचारतात. त्यावर जान्हवी त्यांना माझ्या नादी लागू नका असे पुन्हा बोलते. त्यानंतर वर्षा या एकदम हळू न चिडता सर्व काही बोलताना दिसतात. मात्र जान्हवी काही ऐकायला तयार नसते ती वाटेल तसे बोलत असते. ती वर्षा ताईंना तुमची ही घाणेरडी अॅक्टींग माझ्यासमोर करु नका असे बोलते. त्यावर वर्षा ताई लगेच 'असं कसं मला अॅक्टिंगसाठी शासनाचा पुरस्कार मिळालाय. तो ही तीन वेळा' असे बोलतात. ते ऐकून जान्हवी अक्षरश: तिच्या मर्यादा ओलांडताना दिसते. 'आता त्यांना पश्चाताप होत असेल ह्यांना का दिला आपण तो पुरस्कार. किती चांगले चांगले अभिनेते आहेत बाहेर. त्यांना नाही मिळाला आणि तुम्हाला मिळाला' असे जान्हवी म्हणाली.
वाचा: पंडीत करणार राणीचे आयुष्य उद्ध्वस्त! वाचा 'फिर है हसीन दिलरुबा'चा रिव्ह्यू
'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा दुसरा भाऊचा धक्कादेखील कमाल असणार आहे. आठवडाभर काही सदस्य निर्णय घेण्यात चुकले, तर काही विनाकारण भांडले, काहींनी संधी मिळालेले डाव सोडले. आता वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर आपला रितेश भाऊ या सर्व गोष्टींवर टीका करताना दिसणार आहे.