'बिग बॉस मराठी'च्या घरात काल नॉमिनेशन टास्क पार पडल्याने वातावरण तापलेले आहे. नॉमिनेट झालेले सदस्य नॉमिनेट करणाऱ्या सदस्यांवर आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. आजच्या भागात जान्हवी आणि घन:श्यामच्या वादाने टोक गाठलेलं पाहायला मिळणार आहे. पण त्यांच्यातील वादामुळे इतर सदस्यांना मात्र काहीही फरक पडणार नाही आहे. मात्र, घनःश्याम ज्याप्रकारे जान्हवीशी बोलत आहे ते पाहून नेटकरी खूश झाले आहेत.
कलर्स मराठी वाहिनीने नुकताच बिग बॉस मराठीच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये घनश्याम आणि जान्हवी अतिशय टोकाला जाऊन भांडताना दिसत आहे. प्रोमोमध्ये जान्हवी घन:श्यामसोबत वाद घालत म्हणत आहे, "सगळ्यांना माहिती आहे तुला अक्कल नाही. अख्या घराने तुला नॉमिनेट केलं आहे." त्यावर घन:श्याम म्हणतो, "मला फरक पडत नाही. तू जेलमध्ये राहून आली आहेस. तुला अक्कल नाही आणि मी तुझ्या इतका बावळट नाही." सध्या सोशल मीडियावर हा प्रोम सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
कलर्स मराठी वाहिनीवरने बिग बॉसचा शेअर केलेला हा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी या प्रोमोवर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने 'घणाने काढला फणा' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'जान्हवी फुटेज घेते... गरीब घनश्यामवर ओरडुन... ती निक्कीशी भांडू शकत नाही' असे कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने 'घनश्याम तिला सोडू नकोस... लायकी दाखव तिची' असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाणने केला जान्हवीसोबत ‘झापूक झूपूक’ डान्स, पाहा खास व्हिडीओ
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात पॅडी दादा सूरजची शिकवणी घेताना दिसणार आहेत. नॉमिनेशन टास्कमध्ये सूरजने अरबाजला नॉमिनेट केलं असलं तर नॉमिनेट करण्यासाठी त्याच्याकडे योग्य मुद्दे नव्हते. त्यामुळे सूरजला पॅडी दादा म्हणत आहेत,"अरबाजला नॉमिनेट करायला हवं होतंस..तू तुझा निर्णय बदलायला नको होतास. अरबाजबद्दल योग्य मुद्दे मांडायला हवे होते. गेम सुरू असताना लक्ष ठेवायचं आणि ते लक्षात पण ठेवायचं. प्रयत्न करणं सोडू नको."
संबंधित बातम्या