Bigg Boss Marathi Season 5 Day 30 : छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सध्या धुमाकूळ घालताना दिसत आहे. रोज घरात काही ना काही नवे रडे होताना दिसत आहेत. निक्की, अरबाज, वैभव, घनश्याम, जान्हवी यांची एक टीम होती. पण निक्कीच्या मागे हे लोक तिच्याविषयी काय बोलतात हे रितेशन देशमुखने भाऊच्या धक्क्यावर दाखवले. त्यानंतर निक्कीने त्यांचा ग्रूप सोडला आहे. आता निक्की कोणासोबत खेळणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. अशातच अरबाज आणि आर्या एकत्र आले आहेत. त्यांनी निक्कीला त्रास द्यायचे ठरवले आहे.
या आठवड्याचा बिग बॉसमधील 'भाऊचा धक्का' चांगलाच गाजला आहे. आता या आठवड्यात सदस्य काय धमाका करणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. कालच्या भाऊच्या धक्क्यानंतर निक्की आता एकटी पडली आहे. त्यामुळे तिचा आता एकटीचा खेळ रंगणार आहे.
कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉस मराठीच्या आगामी भागाचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये आर्या अरबाजला सांगत आहे की, "आता आपल्या सर्वांचा मेन दुष्मन एकच झालाय." त्यावर अरबाज निक्की असे उत्तर देतो. आर्या अरबाजला पुढे सांगते की, "विसरू नकोस." अरबाज म्हणतो, "निक्कीला खूप त्रास द्यायचाय." त्यावर आर्या म्हणते, "हो...पूर्णपणे." अरबाज पुढे म्हणतो, "तू अभिजीतला इतका त्रास दे तिला काही नाही होणार." त्यानंतर आर्या निक्की जवळ जाऊन बसते. त्या दोघींमध्ये संभाशण सुरु असते. त्यावेळी निक्की आणि आर्याला म्हणते, "किव येते मला त्या लोकांची."
'बिग बॉस मराठी'चा आजचा भाग खूपच रंजक असणार आहे. या आठवड्यात निक्कीचा चांगलाच बोलबाला आहे. काल इरिना बाहेर पडल्यानंतर आता या आठवड्यात कोणता सदस्य बाहेर पडणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. तसेच निक्की आता कॅप्टनसी टास्कमध्ये कोणत्या टीमसोबत खेळणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. तसेच ती एलिमिनेशन टास्कमध्ये स्वत:साठी कोणाशी डील करणार हे देखील पाहण्यासारखे असणार आहे.
वाचा: भाऊच्या धक्क्यावर सदस्य फेस करणार निर्भीड दुर्गाचे निडर प्रश्न! वैभव कोणाची निवड करणार?
सध्या बिग बॉसच्या घरात निक्की, जान्हवी, अरबाज, वैभव, डीपी, घनश्याम, सूरज, पॅडी, वर्षा उसगावकर, अभिजीत, आर्या, अंकिता हे कलाकार दिसत आहेत. आता यापैकी कोण एलिमिनेशन टास्कमध्ये जाणार हे पाहण्यासारखे आहे.