Bigg Boss Marathi Day 42 : 'बिग बॉस मराठी'च्या गेल्या आठवड्यात काही सदस्यांचं वागणं पाहून प्रेक्षक नाराज झाले. त्यांना चिड आली. आज भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ या सर्व गोष्टींवर बोलताना दिसणार आहे. गणपती स्पेशल भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ निक्कीच्या कारनाम्यावर आवाज उठवताना दिसणार आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ निक्कीला मोडलेल्या स्टुलवर बसवत तिला तिची जागा दाखवून देणार आहे. त्यामुळे प्रेक्षक आजच्या भागाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉस मराठीच्या आगामी भागाचा प्रोमो शेअऱ केला आहे. या प्रोमोमध्ये आजच्या भाऊच्या धक्क्यावर शोचा सूत्रसंचालक रितेश देशमुख निक्कीला चांगलेच सुनावताना दिसत आहे. रितेश भाऊ निक्कीला म्हणतोय,"या आठवड्यात निक्कीने विनाकारण घर डोक्यावर घेतलंय. प्रत्येक सदस्याला त्रास दिलाय. तुम्ही महाराष्ट्रातल्या ११ कोटीपेक्षा जास्त प्रेक्षकांना त्रास दिलाय. असं सगळं करुन लोकांचं मनोरंजन होतं असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. निक्की तुम्हाला बिग बॉसची, प्रेक्षकांची किंमत नाही. घरातील सदस्यांची तुम्ही किंमत ठेवत नाही. बिग बॉसचे नियम वेगळे आणि तुमचे वेगळे आहेत. तुम्ही स्वत;ला क्वीन मानता...पण या आठवड्यात तुम्ही सर्वांची झोकून माफी मागायला पाहिजे."
रितेश भाऊ पुढे म्हणतोय, "निक्की तुम्हाला कॅप्टन म्हणून मिरवायला आवडते ना. तुम्हाला जी कॅप्टन रूम आवडते ना त्याबद्दल इथूनपुढे संपूर्ण सीझनभर तुम्ही कधीही कॅप्टन होणार नाही. मी तुमच्या कॅप्टनसीसोबत तुमची इम्युनिटीपण काढून घेत आहे. आठवडाभर घरातील सर्व भांडी तुम्ही एकटीने घासायची आहेत. तुम्ही जर भांडी घासली नाही तर बिग बॉस पुढच्या आठवड्यात थेट नॉमिनेट करतील. अशा प्रकारची दादागिरी मी खपवून घेणार नाही. कारण हे माझं घर आहे."
वाचा: २ शर्ट आणि तुटलेली चप्पल घालून शोसाठी आलेल्या सूरज चव्हाणकडे डिझायनर कपडे कसे?
नुकताच बिग बॉसच्या घरात कॅप्टनसी टास्क पार पडला. या टास्कमध्ये सूरज चव्हाणला सर्वांनी कॅप्टन बनवले. सूरज कॅप्टन बनताच सर्व स्पर्धक घरात झापुक झुपूक स्पेट करताना दिसले. आता सोशल मीडियावर सूरजचे जोरदार कौतुक होत आहे. तसेच घरात निक्कीचे वागणे पाहून सर्वांना धक्का बसला. तिने सर्वच स्पर्धकांना त्रास दिला आहे. आता भाऊच्या धक्क्यावर रितेश निक्कीला शिक्षा देणार.