बिग बॉस मराठी हो शो दिवसेंदिवस रंजक ठरत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात नुकताच नॉमिनेश टास्क पार पडला. या टास्कमध्ये वर्षा उसगावकर, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक नॉमिनेट झाले. त्यानंतर दर रविवारी एका स्पर्धकाला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागते. गेल्या आठवड्यात अरबाज पटेल हा बिग बॉसचा स्पर्धक घराबाहेर आला आहे. पण अरबाजला दुसऱ्या एका रिअॅलिटी शोची ऑफर आल्यामुळे त्याला घराबाहेर पडावे लागल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
'बिग बॉस मराठी'च्या घरात अरबाजने आपल्या स्टाईल आणि स्वॅगने चाहत्यांना घायाळ केलं. जिगरबाज तरुणाने 'बिग बॉस मराठी'च्या घरात चांगलाच धुमाकूळ घालता होता. निक्की आणि त्याची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पण आता 'बिग बॉस मराठी'च्या घरातला त्याचा प्रवास संपला आहे. त्याला बिग बॉस हिंदीच्या १८व्या सिझनची ऑफर आल्यामुळे त्याला शोमधून काढण्यात आल्याचे म्हटले जात आहे. आता सर्वजण बिग बॉस हिंदीची वाट पाहात आहेत.
'बिग बॉस मराठी'च्या या आठवड्यात अरबाज घराबाहेर पडल्याने निक्कीसह सर्व सदस्यांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातल्या या चॉकलेट बॉय अरबाजने ताकदीच्या जोरावर अनेक टास्क जिंकले. या आठवड्याचा तो कॅप्टनदेखील होताना दिसला होता. पण अचानक त्याचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे. त्याच्या जाण्याने आता निक्की एकटी पडली आहे.
वाचा: 'लाफ्टर शेफ'च्या सेटवर रीम शेखनंतर राहुल वैद्यचा अपघात, चेहऱ्यावर आली आग
'बिग बॉस मराठी'च्या घरातून प्रत्येक आठवड्याला कोणाला ना कोणाला बाहेर पडावं लागतं. अरबाजने त्याच्या पद्धतीने चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न केला. 'बिग बॉस मराठी'च्या घरातून निरोप घेताना अरबाज म्हणाला,"महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मला आपलंसं केलं आहे. माझा प्रवास त्यांनी पाहिला आहे. या खेळात माझं काही चुकलं असं मला वाटलं नाही. निक्कीसोबतची जर्नी खूप छान होती."
'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये, निक्कीला अरबाजची खूप आठवण येत असल्याचं पाहायला मिळत आहे. निक्की म्हणतेय,"अरबाज तू मला सोडून कुठे गेला आहेस?". पुढे अरबाजच्या नावाचाच कॉफी कप निक्की वापरताना दिसत आहे. निक्की म्हणतेय,"मी घरात तुझ्या नावाचा कप घेतला आहे...पण तुच नाही आहेस आज". जान्हवी पुढे म्हणतेय,"ही राणी पूर्ण हल्ली आहे".