Bigg Boss Marathi: जोड्या घरात बांधलेल्या असतात; 'बिग बॉस मराठी'च्या घरातील नवी जोडी पाहिलीत का?-bigg boss marathi season 5 update abhijeet sawant song for nikki tamboli ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss Marathi: जोड्या घरात बांधलेल्या असतात; 'बिग बॉस मराठी'च्या घरातील नवी जोडी पाहिलीत का?

Bigg Boss Marathi: जोड्या घरात बांधलेल्या असतात; 'बिग बॉस मराठी'च्या घरातील नवी जोडी पाहिलीत का?

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 26, 2024 05:05 PM IST

Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या घरात आता आणखी एक नवी जोडी पाहायला मिळत आहे. ही जोडी पाहून सर्वजण चकीत झाले आहेत.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त असलेला शो म्हणून 'बिग बॉस मराठी' पाहिला जातो. यंदाचा बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन हा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. घरातील सदस्य आणि त्यांचे कारनामे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होऊन बघता बघता एक महिना पूर्ण झाला आहे. घरात पहिल्या दिवसापासूनच अरबाज आणि निक्कीमध्ये मैत्रिचे नाते पाहायला मिळाले. पण आता घरात एक नवी जोडी बनली आहे. या जोडीची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

गेले महिनाभर 'बिग बॉस मराठी'च्या घरातील निक्की आणि अरबाजची मैत्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली. पण भाऊच्या चक्रव्यूहात गेल्यावर निक्कीसमोर सत्य आले आहे. अरबाज हा निक्कीच्या तोंडावर गोड बोलत असला तरी मागे फार वाईट बोलत असल्याचे निक्कीला कळाले. सत्य समोर आल्यानंतर निक्की आणि अरबाजमध्ये चांगलाच दुरावा आला आहे. निक्की एकटी खेळेल असं वाटत असताना तिने अभिजीतसोबत हातमिळवणी केलेली आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

बिग बॉसने अभिजीतला विचारले गाणे

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये निक्की आणि अभिजीत गप्पा मारताना दिसत आहेत. ते दोघे एकमेकांसोबत मजा-मस्ती देखील करत आहेत. दरम्यान बिग बॉस म्हणतात, "अभिजीत जोडीत बांधले गेले आहात. या परिस्थितीवर कोणते गाणे सुचत आहे?" त्यावर अभिजीत म्हणतो, "हम दोनो दो प्रेमी..." त्यानंतर घरात एकच हशा पिकतो.

अभिजीतने गायले गाणे

अभिजीतच्या गाण्यानंतर अंकिता म्हणते, "आज कळलं आम्हाला जोड्या बिग बॉसच्या घरात बांधलेल्या असतात". त्यावर अभिजीत 'कुछ तू लोग कहेंगे' हे गाणं म्हणतो. बिग बॉस मराठीचा आजचा भाग खूपच कमाल असणार आहे. घरातील सदस्य घाबरले ले असताना दुसरीकडे निक्की आणि अभिजीत सदस्यांना चांगलच हसवणार आहेत.
वाचा : अरबाज खानचा मुलगा अरहान सावत्र आईसोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, दोघांमधील नाते पाहून नेटकरी खूश

बिग बॉसच्या घरातील स्पर्ध क

सध्या बिग बॉसच्या घरात निक्की, जान्हवी, अरबाज, वैभव, डीपी, घनश्याम, सूरज, पॅडी, वर्षा उसगावकर, अभिजीत, आर्या, अंकि ता हे कलाकार दिसत आहेत. आता या पैकी कोण एलिमिनेशन टास्क मध्ये जाणार हे पाहण्या सारखे आहे.