Bigg Boss Video: अभिजीत सावंतने केली शाहरुख खानची नक्कल, वर्षा उसगावकरांनी केले कौतुक-bigg boss marathi season 5 update abhijeet sawant mimicry of shah rukh khan see video ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss Video: अभिजीत सावंतने केली शाहरुख खानची नक्कल, वर्षा उसगावकरांनी केले कौतुक

Bigg Boss Video: अभिजीत सावंतने केली शाहरुख खानची नक्कल, वर्षा उसगावकरांनी केले कौतुक

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 17, 2024 05:37 PM IST

Bigg Boss Marathi Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये गायक अभिजीत सावंत हा शाहरुख खानची नक्कल करताना दिसत आहे.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi Day 52 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात सदस्य आपला खेळ दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. खेळ दाखवताना कधी कोण कोणाचा गेम पलटवतं हे सांगू शकत नाही. पहिल्या आठवड्यात दिसणाऱ्या एका टीममध्ये शेवटच्या आठवड्यातही तेच एकीचं चित्र पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. हा खेळ खेळता खेळता स्पर्धक हे प्रेक्षकांचे मनोरंजन देखील करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीत सावंत शाहरुख खानची नक्कल करताना दिसत आहे.

काय आहे व्हिडीओ?

'राजश्री मराठी'ने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बिग बॉस मराठी सिझन ५च्या घरातील स्पर्धक, गायक अभिजीत सावंत हा स्वयंपाक करत असतो. त्याच्यासमोर गोलिगत सूरज चव्हाण आणि वर्षा उसगावकर हे बसलेले असतात. व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की अभिजीत हा स्वयंपाक करताकरता बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची नक्कल करत आहे. ते पाहून वर्षा उसगावकर यांनी अभिजीतचे कौतुक केले आहे.

अभिजीतने मारले शाहरुखचे डायलॉग

व्हिडीओच्या सुरुवातील अभिजीत सावंत हा 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटातील गाण्याचे म्यूझिक गात आहे. त्यानंतर त्याने शाहरुख खानची नक्कल केली आहे. ते पाहून सूरज चव्हाणने आज शाहरुख खान काय बनवत आहे? असा प्रश्न विचारला. त्यावर अभिजीतने, 'डाळ राईस' असे उत्तर दिले. पुढे तो म्हणाला, 'एकम मस्त खिचडी बन रही है, बहोत ही बढीया लग रही है.' त्यानंतर तो शाहरुखच्या स्टाईलमध्ये हसताना दिसतो.

पुढे अभिजीत म्हणाला, 'इतनी अच्छी खिचडी... हा हा हा हा... ए जो खिचडी है ना ए मेरे दिलके बहोत करीब है... हा हा हा हा... एवढच येतं रे मला.. अजून नाही.' अभिजीतने केलेली नक्कल पाहून वर्षा उसगावकर हा टाळ्यांचा कडकडाट करुन कौतुक करतात. सध्या सोशल मीडियावर अभिजीतचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: 'बिग बॉस मराठी'साठी अभिजीत-निक्कीने घेतले लाखो रुपये, सूरज चव्हाणला आठवड्याला किती मिळते फी?

आजच्या भागात काय घडणार?

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात पॅडी दादा, अंकिता, अभिजीत आणि संग्राम अरबाजबद्दल चर्चा करताना दिसणार आहेत. पॅडी दादा म्हणत आहेत,"अरबाजचा नेहमीच ओव्हर कॉन्फिडन्स नडतो". संग्राम म्हणतो,"जिंकण्याचं कधीच सेलिब्रेशन करायचं नसतं. निक्कीचं का ऐकतो तो?. त्याला मतं नाहीत". पॅडी दादा पुढे म्हणतो,"निक्की अरबाजला घेऊन बुडणार एवढं नक्की".

Whats_app_banner