'बिग बॉस मराठी'च्या कालच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने जान्हवीची चांगलीच हजेरी घेतली. तसेच भाऊच्या धक्क्यावर स्थान न देता तिला जेलची शिक्षादेखील सुनावली. आता आजचा भाऊच्या धक्क्यावर काय होणार याकडे सर्वांचच लक्ष लागले आहे. कोणता सदस्य घराबाहेर जाणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अशाकत आज भाऊच्या धक्क्यावर सदस्य निर्भीड दुर्गाच्या निडर प्रश्नांना सामोरे जाताना दिसून येणार आहेत.
कलर्स मराठी वाहिनीवर 'दुर्गा' ही नवी मालिका २६ जुलैपासून दररोज संध्याकाळी साडेसात वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आजच्या भाऊच्या धक्क्यावर दुर्गा मालिकेच्या कलाकारांनी अर्थात रूमानी खरे, अंबर गणपुले आणि शिल्पा नवलकर यांनी हजेरी लावली आहे. दुर्गाने घेतलेल्या रॅपिड फायरमध्ये कोण जिंकणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भाऊच्या धक्क्याच्या आजच्या प्रोमोमध्ये दुर्गा डीपीदादाला विचारतेय, "आई आणि बायकोला फोन कॉल की एक किलो मटन." वैभवला विचारतेय, "कोणाची मैत्री जास्त महत्त्वाची आहे इरिना की अरबाज." अरबाजला विचारतेय, "या घरात तुम्हाला काय महत्त्वाचं वाटतं प्रेम की गेम." आता रॅपिड फायरमध्ये सदस्य काय उत्तर देणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान दुर्गा मालिकेतील दुर्गा सदस्यांसोबत रॅपिड फायर खेळणार आहे. आजच्या भागात रॅपिड फायरमध्ये दुर्गा अभिजीत सावंतला विचारते,"'टीम B मधूल एका सदस्याला काढून टीम A मधल्या एका सदस्याला घ्यायचं असेल तर कोणाला काढाल आणि कोणाला घ्याल?". यावर अभिजीत आर्याला काढून इरिनाला घेईल असं उत्तर देतो. "या क्षणाला सगळ्यात जास्त कोणाची आठवण येते?", याचं उत्तर देत अभिजीत म्हणतो,"सर्वात जास्त घराची आठवण येते". अंकिता आणि निक्कीमध्ये सर्वोत्कृष्ट कॅप्टन कोण? यावर अभिजीत अंकिताचं नाव घेतो. तर अभिजीतच्या मते टॉप 3 सदस्य हे निक्की, अंकिता आणि अरबाज हे आहेत.
वाचा: अरबाज खानचा मुलगा अरहान सावत्र आईसोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, दोघांमधील नाते पाहून नेटकरी खूश
दुसरीकडे बिग बॉस मराठीमध्ये एमर्जन्सी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी श्रेयस तळपदे आणि कंगना रणौत येणार आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात कंगना रनौत आणि श्रेयस तळपदे सदस्यांना चांगलच खेळवणार आहेत. आजच्या भागात श्रेयस वर्षा ताईंना विचारतो,"तुमच्यासाठी चित्रपटाचं नाव आहे 'झपाटलेला". त्यानंतर वर्षा ताई म्हणतात,"बिग बॉस मराठी'च्या घरातील झपाटलेला व्यक्ती वैभव आहे". त्यानंतर गॅसच्या फुग्याची हवा इन्हेल करुन वैभव एक खास डायलॉग म्हणतो". आजच्या भागात घरातील सर्वच सदस्यांचा बदललेचा आवाज ऐकताना प्रेक्षकांचं मात्र चांगलच मनोरंजन होणार आहे.
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या विशेष भागात भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ सदस्यांना छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडेला विचारणार आहे,"माचिसचं काम काय?". उत्तर देत छोटा पुढारी म्हणतो,"काडी लावणं". त्यावर रितेश भाऊ छोटा पुढारीला विचारतो,"बिग बॉस मराठी'च्या घरातला कोणता सदस्य आहे जो घरात आग लावायचं काम करतो?". रितेश भाऊला उत्तर देत छोटा पुढारी म्हणतो,"माझ्या मते, माचिस मी डीपी दादाला देऊ इच्छितो.. कारण निक्की आणि माझं जे भांडण झालं ते डीपी दादांमुळे झालं होतं". इतर सदस्य कोणतं चिन्ह कोणाला देणार हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग पाहायला विसरू नका.