'बिग बॉस मराठी'साठी अभिजीत-निक्कीने घेतले लाखो रुपये, सूरज चव्हाणला आठवड्याला किती मिळते फी?-bigg boss marathi season 5 suraj chavan and other contestant fees ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'बिग बॉस मराठी'साठी अभिजीत-निक्कीने घेतले लाखो रुपये, सूरज चव्हाणला आठवड्याला किती मिळते फी?

'बिग बॉस मराठी'साठी अभिजीत-निक्कीने घेतले लाखो रुपये, सूरज चव्हाणला आठवड्याला किती मिळते फी?

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 12, 2024 03:09 PM IST

Bigg Boss Marathi contestant fees: 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन चांगलाच रंगला आहे. या सिझनमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक कलाकाराची विशेष चर्चा रंगली आहे. चला जाणून घेऊया त्यांच्या मानधनाविषयी...

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi contestant fees: छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन प्रेक्षकांचे विशेष मनोरंजन करताना दिसत आहे. यंदाच्या सिझनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी प्रेक्षकांची मने देखील जिंकली आहेत. आता बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांच्या मानधनाविषयी चर्चा रंगली आहे. कोणत्या कलाकाराला सर्वाधिक मानधन मिळाले आणि कोणत्या कलाकाराला सर्वात कमी हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

बिग बॉस मराठीचा यंदाचा सिझन हा इतर सिझनपेक्षा अतिशय वेगळा आहे. कारण यंदा कलाकारांसोबतच मीडिया इन्फ्लूएंसर देखील सहभागी झाले आहेत. पण मग कलाकार आणि एन्फ्लूएंसर यांच्यामध्ये मानधनाचा किती फरक आहे? कोणाला किती फी देण्यात आली असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉस मराठी मधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्पर्धकांमध्ये वर्षा उसगावकर, अरबाज पटेल, अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळीचा समावेश आहे. मात्र, बिग बॉसच्या घरातील यंदाचा सर्वात महागडा स्पर्धक कोण आहे? हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

कोण आहे सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक?

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सदस्यांसमध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्या एका आठवड्यासाठी जवळपास २.५० लाख रुपये घेत असल्याचे म्हटले जात आहे. पण वर्षा या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री नाहीत. हिंदी 'बिग बॉस गाजवून आलेली निक्की तांबोळी या सिझनमध्ये सहभागी होण्यासाठी दर आठवड्याला ३.७५ लाख रुपये फी आकारत आहे. तर इंडियन आयडॉल फेम गायक अभिजीत सावंत हा बिग बॉस मराठीतील दुसरा सर्वात जास्त मानधन घेणारा स्पर्धक आहे. अभिजीत सावंत दर आठवड्याला ३.५० लाख रुपये मानधन घेत आहेत.

कलाकारांचे मानधन

कलर्स चॅनेलच्या स्टार अभिनेत्री अभिनेत्री योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर यांना एका आठवड्यासाठी १.२५ लाख रुपये देण्यात आल्याचे म्हटले जाते. अभिनेता निखिल दामलेला देखील १.२५ लाख रुपये देण्यात आल्याच्या चर्चा आहेत. नऊवारी रॅपर आर्या जाधवला प्रत्येक आठवड्याला प्रत्येकी एक लाख रुपये आणि पॅडी कांबळे एक आठवड्यासाठी २ लाख रुपये कमवत आहेत. पहिल्याच आठवड्यात घराबाहेर गेलेले पुरुषोत्तम दादा पाटील यांनी एका आठवड्यासाठी १.३५ लाख दिले गेल्याचे म्हटले जाते.
वाचा: २ शर्ट आणि तुटलेली चप्पल घालून शोसाठी आलेल्या सूरज चव्हाणकडे डिझायनर कपडे कसे?

सूरज चव्हाणला सर्वात कमी मानधन

अंकिता वालावलकर हिला बिग बॉससाठी दर आठवड्याला जवळपास ५० ते ६० हजार इतकं मानधन मिळत असल्याची चर्चा आहे. स्टाग्राम स्टार धनंजय पोवार एका आठवड्यासाठी ६० हजार फी, अभिनेता वैभव चव्हाण दर आठवड्याला ७० हजार रुपये, छोटा पुढारी धनश्याम दरोडे ५० हजार आणि गोलिगत सूरज चव्हाणला इतर सदस्यांपेक्षा सर्वात कमी म्हणजे केवळ २५ हजार रुपये देण्यात येत असल्याचे म्हटले जाते.

Whats_app_banner