‘बिग बॉस मराठी ५’ या रिअॅलिटी शोमध्ये आज आठवड्यात धुमश्चक्री पाहायला मिळत आहे. कारण बिग बॉस मराठीच्या घरात ‘भाऊचा धक्का’ हा विशेष भाग पार पडला आहे. या भागात होस्ट रितेश देशमुखने घरातील ए टीमला चांगेलच फटकारले आहे. सतत आरेरावीची भाषा करणाऱ्या निक्की तांबोळीला बिग बॉस मराठीच्या घरात रितेशने तिचे स्थान दाखवले आहे. एकंदरीत रितेशने सर्वांची शाळा घेतली आहे. दरम्यान, रितेशने केलेले एक वाक्य सध्या चर्चेत आहे.
दर आठवड्याच्या शेवटी रितेश देशमुख बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धकांची शाळा घेण्यासाठी भाऊच्या धक्क्यावर येतो. आठवडाभर स्पर्धकांनी केलेल्या चुका रितेश त्यांना दाखवून देतो. या आठवड्यात निक्कीने घनश्याम दरवडेला कर्मचारी म्हणून हिणवले होते. तिला कर्मचारी ही खालच्या दर्जाची पदवी असल्याचे वाटत असल्यामुळे ती घनश्यामला सारखे कर्मचारी म्हटले. शेवटी काल भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीला चांगलेच सुनावले.
रितेशने निक्कीला सुनावताना म्हटले की, 'एक वेळ देश पंतप्रधान नसेल तरीही चालेल पण कर्मचारी पाहिजेतच. कर्मचाऱ्यांनाशिवाय देश चालू शकत नाही.' आता रितेश देशमुख याच्या या विधानाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. सर्वजण रितेशचे कौतुक करताना दिसत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर रितेशचे हे वक्तव्य हृदयस्पर्शी असल्याचे म्हटले आहे.
वाचा: माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुला स्थान नाही; रितेशने जान्हवीला दाखवला बाहेरचा रस्ता
'बिग बॉस मराठी'च्या या आठवड्यात जान्हवी पॅडी दादांना म्हणाली होती, “आयुष्यभर अॅक्टिंग केली आता इथे येऊन ओव्हरअॅक्टिंग करताय.” त्यावर जान्हवीला सुनावत रितेश भाऊ म्हणाला,"जान्हवी तुम्ही 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासातील एक वाईट सदस्य आहात. कोणत्या गोष्टीत किती पर्सनस जावे याची लिमिट असते. डिक्शनरीमध्ये ओव्हर हा शब्द फक्त तुमच्यासाठी आहे. या भाऊच्या धक्क्यावर आता मी बंदोबस्त करणार आहे. हा शो फक्त तीन महिन्यांपूरता आहे. लोक इथे करिअर घडवायला येतात. तुम्ही काय संपवायला आला आहात... तुमचा ओव्हर कॉन्फिडिन्स तुम्हाला नडणार आहे."
रितेश भाऊ पुढे म्हणाला, “तुम्ही नाटकी आहात तुम्ही ढोंगी आहात. लोकांना सगळं दिसतय. तुम्ही मेलोड्रामा करता. सगळे कॅमेरे स्वत:कडे वळवण्याचा प्रयत्न करता. पॅडींची मागितलेली माफी मनापासून होती का? एवढं असूनही पॅडी भाऊंनी मोठ्या मनाने तुम्हाला माफ केले. जान्हवी तुम्ही मोठ्या कलाकारांसह छोट्या कलाकारांचाही अपमान करताय. कलाकार छोटा असो किंवा मोठा असो तो कलाकारच असतो. खोटं वागण्याला एक लिमिट असते. आम्हाला असं वाटतं जान्हवी जे करते ते सगळं नाटक आहे. या घरातली सगळ्यात खोटारडी व्यक्ती जान्हवी आहे." त्यानंतर जान्हवीला शिक्षा म्हणून जेलमध्ये टाकण्यात आले.