बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालक, घरात वेगवेगळे स्पर्धक या सर्वांमुळे बिग बॉस मराठी सिझन ५ प्रेक्षकांची मने जिंकत आहे. आता रिल स्टार सूरज चव्हाणची चर्चा रंगली आहे. गुलिगत धोका असे म्हणत सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या सूरज चव्हाणने बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी व्यावसायिक आयुष्याविषयी मोठा खुलासा केला आहे. ते ऐकून घरातील स्पर्धकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी स्पर्धकांना मोठ्या आव्हानांना समोरे जावे लागले आहे. सकाळी उठल्या उठल्या बिग बॉसच्या घरातील पाणी गेले आहे. त्यानंतर त्यांना नाश्ता देखील देण्यात आलेला नाही. घरात पाणी, अन्न नसल्यामुळे सर्वजण हैरान होतात. पॅडी कांबळे, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण आणि घरातील काही सदस्य गप्पा मारत होते. त्यावेळी सूरजने आपल्या आयुष्यातील काही प्रसंग सांगितले.
टिक टॉक या अॅपने सूरजला प्रसिद्धी मिळवून दिली होती. तो टिक टॉक वरील टॉप व्हिडीओ क्रिएटर्सपैकी एक होता. तो चांगले पैसे कमावत होता. तसेच प्रसिद्ध असल्यामुळे त्याला अनेक कार्यक्रमांना देखील बोलावण्यात येत होते. स्पर्धकांशी गप्पा मारत असताना सूरजने सांगितले की त्यावेळी तो फक्त एखाद्या उद्घाटन सोहळ्याला जाण्यासाठी ८० हजार रुपये घ्यायचा. पण अनेक जवळच्या लोकांनी त्याची फसवणूक देखील केली. आता सूरज एका दिवसाचे ३० ते ४० हजार रुपये घेतो. ते ऐकून तेथे बसलेल्या स्पर्धकांच्या भुवया उंचावल्या.
सूरजने गप्पा मारताना सांगितले की, 'याआधी माझी खूप फसवणूक झाली आहे. त्यामुळे माझ्या बहिणींना खूपच काळजी वाटते. तू फक्त सुधार आम्हाला खूप बरं वाटेल असे बहिणींनी सांगितले असल्याचे सूरज म्हटला.'
वाचा: 'बिग बॉस मराठी ५'च्या घरातील अंकिता वालावलकरचा बॉयफ्रेंडने केला होता छळ, वाचा खासगी आयुष्याविषयी
सूरज चव्हाणने 'टिक टॉक'च्या पहिल्या दहात स्थान मिळवले होते. त्याचा गुलिगत हा डायलॉग तुफान चर्चेत असायचा. त्याला बिग बॉसच्या घरात पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. सूरजचे आता इन्स्टाग्राम अकाऊंटवर ९ लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तो मूळचा बारामतीचा आहे.
संबंधित बातम्या