गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा 'बिग बॉस मराठी' हा रिअॅलिटी शो आज अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाच्या म्हणजेच बिग बॉस सिझन ५चे सूत्रसंचालन मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख करत आहे. आता या शोमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जेव्हा या सिझनची घोषणा करण्यात आली तेव्हा पासून घराची थिम काय असणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. आज अखेर बिग बॉसचे घर समोर आले आहे. बिग बॉसच्या घरात गार्डन थिम, अंडरवॉटर थिम, मुखवटे, वॉशरुममध्ये काचेचे तुकडे वापरुन केले इंटिरिअर सर्वांचे लक्ष वेधत आहे.
बिग बॉस मराठी सिझन पाचचा सूत्रसंचालक रितेश देशमुख ग्रँड एण्ट्री झाली आहे. आता रितेश कोणते स्पर्धक घरात सहभागी होणार याविषयी सांगणार आहे.
बिग बॉस मराठी सिझन ५ची पहिली स्पर्धक समोर आली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून वर्षा उसगावकर आहेत. त्यांनी उत्तम डान्स करत बिग बॉसच्या घरात एण्ट्री घेतली आहे. त्यांनी ड्यूटी फ्री कार्ड घेतले आहे. जेणेकरुन पहिल्या आठवड्यात त्यांना काम करायला लागणार नाही.
कोकण आणि पुण्याचा वाद कायमच राहणार आहे. तो मिटवण्यासाठी इनफ्लूएंसर अंकिता प्रभू-वालावलकर आणि यूट्यूबर निखिल एकत्र घरात पोहोचले आहेत.
अंकिताने बिबी करंसी हा पर्याय निवडला आहे. त्यासाठी तिने बिग बॉसने दिलेले सीफूड नाकारले आहे. तर अंकितने देखील बिबी करंसी घेतली आहे.
मराठी मनोरंजनाचा राजा म्हणून अभिनेता पॅडी कांबळे ओळखला जातो. आता त्याची बिग बॉस मराठीच्या घरात एण्ट्री झाली आहे. त्याला पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
अभिनेत्री योगिता चव्हाण ही जीव माझा गुंतला या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर भाग्य दिले तू मला मालिकेत सानियाची भूमिका साकारणी जान्हवी किल्लेकर एकत्र बिग बॉसच्या घरात एण्ट्री करत आहेत. दोघांचाही परफॉर्मन्स पाहण्यासारखा होता.
इंडियन आयडल जिंकलेला गायक अभिजीत सावंत बिग बॉस मराठी सिझन ५च्या घरात दिसणार आहे त्यामुळे प्रेक्षकांमध्ये शोबाबत उत्सुकता वाढली आहे.
नेहमी राजकीय सभा गाजवणारा छोटा पुढारी, घनःश्याम दरवडे बिग बॉसच्या घरात एण्ट्री घेत आहे. त्याच्याशी बोलण्यासाठी शोचा सूत्रसंचालक रितेश देशमूख चक्क गुडघ्यावर बसला आहे.
अभिनेत्री इरिना रुडिकोवा ही अंतरराष्ट्रीय कलाकार आहे. ती एक उत्तम डान्सर आहे, तिने काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता इरिना बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. तिची मराठी भाषा स्पर्धकांना कितपत कळणार हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
मूळची औरंगाबादची असणारी निक्की तंबोळी आता बिग बॉस मराठी सिझन ५मध्ये दिसणार आहे.
बारामतीचा रांगडा गडी अभिनेता वैभव चव्हाण आणि अरबाज पटेलची बिग बॉस मराठी ५च्या घरात एण्ट्री झाली आहे.
महाराष्ट्राची यंग रॅप स्टार आर्या जाधवची बिग बॉस मराठीच्या घरात करणार कल्ला. तिच्या रॅपने रितेश खूश झाला आहे.
मॉर्डन आणि टेक्नो सेवी असणारे नव्या युगाचे कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांची बिग बॉस मराठी सिझन ५च्या घरात एण्ट्री झाली आहे. पुरुषोत्तम हे रायगडमध्ये मठाधीपती म्हणून प्रसिद्ध आहेत.
घरी आई आणि बायकोच्या आदेशाबाहेर न जाणारे धनंजय पोवार आता ऐकणार बिग बॉसचे आदेश. घरात धमाकेदार एण्ट्री झाली आहे.
'गोलीगत धोका' असे म्हणत अनेक रिल्सच्या माध्यमातून अनेकांना वेड लावणारा सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात दिसणार आहे.
संबंधित बातम्या