छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून 'बिग बॉस मराठी' पाहिला जातो. या शोचा पाचवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदा शोमध्ये देखील बरेच बदल झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. 'बिग बॉस मराठी ५'चे सूत्रसंचालन अभिनेते महेश मांजरेकर यांच्या ऐवजी अभिनेता रितेश देशमुख करणार असल्याचे समोर आले आहे. आता या शोचा नवा प्रोमो व्हायरल झाला आहे.
रितेशने आजवर आपल्या अभिनयाने रसिकांना 'वेड' लावले आहे. पण आता टेलिव्हिजनचा पडदा व्यापून टाकायला, 'बिग बॉस’ मराठीचा हा नवा सिझन गाजवायला, वाजवायला तो सज्ज झाला आहे. रितेशच्या येण्याने 'बिग बॉस'च्या घरात जबरदस्त कल्ला होणार आहे. एकंदरीतच आपल्या मराठमोळ्या रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार आहे, हे नक्की!
वाचा: लेकाच्या लग्नासाठी नीता अंबानी यांची खास तयारी, खरेदी केलेल्या नव्या साडीची किंमत माहिती आहे का?
'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो नुकताच आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये रितेशचा रूबाब अन् त्याची 'लय भारी' स्टाईल पाहायला मिळत आहे. तसेच त्याचा कमाल स्वॅगही अनुभवायला मिळत आहे. रितेशची 'बॉसी'गिरी पाहण्याची चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. 'बिग बॉस'मध्ये आतापर्यंत एका वेगळ्या पद्धतीचे खेळ, नियम आणि टास्क होते. पण आता रितेशच्या येण्याने नावीन्य येणार असल्याचं प्रोमोवरुन स्पष्ट दिसत आहे. त्यामुळेच तर रितेश भाऊ म्हणतोय,"आता मी आलोय... कल्ला तर होणारच...!!”
वाचा: 'प्रेमासाठी लढणार', ब्रेकअपच्या चर्चांवर अखेर मलायका अरोराने सोडले मौन
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनची घोषणा झाल्यापासून चर्चा सुरु आहे. आता नवा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर पाचव्या सिझनच्या प्रदर्शनाची तारीख घोषीत करण्यात आली की नाही? हे सर्वजण पाहात होते. पण अद्याप सिझनच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली नसल्यामुळे सर्वांचा हिरमोड झाला आहे.
वाचा: मुंबईतील पॉश भागात आमिर खानने खरेदी केला नवा फ्लॅट, किंमत वाचून बसेल धक्का
'कलर्स मराठी' आणि JioCinema च्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची घोषणा करण्यात आली. येथेच बिग बॉस पाहायला मिळणार आहे. जिओ सिनेमावर बिग बॉस २४तास लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. तर कलर्स मराठी वाहिनीवर नेहमीप्रमाणे दररोज एक तास बिग बॉस शो लागणार आहे.
संबंधित बातम्या