मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘बिग बॉस मराठी सीझन ५’ येतोय? आज होणार मोठा खुलासा! नव्या प्रोमोने वाढवली चाहत्यांची आतुरता!

‘बिग बॉस मराठी सीझन ५’ येतोय? आज होणार मोठा खुलासा! नव्या प्रोमोने वाढवली चाहत्यांची आतुरता!

May 21, 2024 08:20 AM IST

नुकतीच ‘बिग बॉस मराठी ५’ची घोषणा झाली असून, लवकरच या रियॅलिटी शोचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘बिग बॉस मराठी सीझन ५’ येतोय? आज होणार मोठा खुलासा!
‘बिग बॉस मराठी सीझन ५’ येतोय? आज होणार मोठा खुलासा!

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत असलेला शो म्हणजे ‘बिग बॉस’. ‘हिंदी बिग बॉस’ने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. मात्र, मराठी बिग बॉस ही प्रचंड गाजलं. आतापर्यंत ‘बिग बॉस मराठी’चे ४ सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेले आहेत. ‘बिग बॉस मराठी’चा ५वा सीझन कधी येणार याची प्रेक्षकांना आतुरता लागून राहिली होती. मात्र, आता प्रेक्षकांची हीच प्रतीक्षा काही वेळातच संपणार आहे. नुकतीच ‘बिग बॉस मराठी ५’ची घोषणा झाली असून, लवकरच या रियॅलिटी शोचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून नुकताच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या व्हिडीओमध्ये एक ते पाच काउंटडाऊन होताना दिसले आहे. व्हिडीओमध्ये अनेक टीव्ही दिसत असून, या काउंटडाऊननंतर ‘सर्व रियॅलिटी शोजचा बाप येतोय... पुन्हा सर्वांना वेड लावायला... पहिली झलक, पाहा उद्या २१ मे रोजी सकाळी दहा वाजता’, असं या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडीओ रिलीज होताच आता सोशल मीडियावर ‘बिग बॉस मराठी सीझन ५’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५मध्ये कोणकोणते कलाकार स्पर्धक म्हणून दिसणार, हे जाणून घेण्याची आतुरता देखील प्रेक्षकांना लागून राहिली आहे. या व्हिडीओद्वारे ‘मराठी बिग बॉस’च्या ५व्या सीझनची घोषणा करण्यात आल्याचं देखील सगळे म्हणत आहेत. मात्र, या व्हिडीओमधून अजून काहीही स्पष्ट झालेले नाही. त्यासाठी प्रेक्षकांना दहा वाजेपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

कोण सांभाळणार सूत्रसंचालन?

बिग बॉस मराठीचे आतापर्यंत चार सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, या पाचव्या सीझनसाठी सगळ्यांचीच उत्सुकताच शिगेला पोहोचली आहे. या आधीचे चारही सीझन चांगलेच गाजले होते. तर, ‘बिग बॉस मराठी’च्या आतापर्यंतच्या सगळ्या सीझन्सचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते. मात्र, गेल्या सीझनमध्ये ते आजारी पदल्याने पुढचं सीझन कुणीतरी दुसरंच दिसेल, असं म्हटलं जात होतं. परंतु, महेश मांजरेकर यांच्याशिवाय या शोला मजा येणार नाही, असे चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे म्हणणे आहे.

‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ची सगळ्यांना उत्सुकता!

त्यामुळे आता या नवीन सीझनचे सूत्रसंचालन कोण करणार? यामध्ये कोण कोण सहभागी होणार?, हे पाहणं रंजक ठरणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सीझनची विजेती मेघा धाडे ठरली होती. तर, दुसऱ्या सीझनमध्ये शिव ठाकरेने बाजी मारली होती. तिसऱ्या सीझनचा विजेता विशाल निकम होता. तर, चौथ्या सीझनच्या ट्रॉफीवर अक्षय केळकरने नाव कोरलं होतं. आता पाचव्या सीझनमध्ये कोण कोण असणार आणि ही चुरस कशी रंगणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४