Bigg boss Marathi 5: छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाचा सिझन हा सर्वांसाठी अतिशय वेगळा ठरला आहे. या सिझनचे सूत्रसंचालन रितेश देशमुख करत आहे. त्यासोबतच शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमध्ये कलाकारांसोबतच इन्फ्लूएंसर देखील दिसत आहेत. त्यात महाराष्ट्राचा छोटा पुढारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घन:श्याम दरवडेचा देखील सहभाग आहे. आजच्या भागात घन:श्याम दरवडे हा कोल्हापूरचा सोशल मीडिया स्टार धनंजय पोवारवर चिडताना दिसणार आहे. चला पाहूया नेमकं काय झालं?
'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील आजच्या भागात प्रेक्षकांना एकापेक्षा एक मनोरंजनाचे खास सरप्राईज मिळणार आहेत. यंदाच्या सीझनमधील १६ महारथी एकमेकांना नॉमिनेट करताना दिसणार आहेत. त्यामुळे चौथ्या दिवशीच घरात राडे अन् धमाका झालेला पाहायला मिळणार आहे.
'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये घन:श्याम नॉमिनेट करताना स्पर्धकाचे नाव घेत आहे. त्याने धनंजय असे नाव घेतले असून का नॉमिनेट केले हे सांगताने मजेशीर कारण दिले. ,"सकाळी माझ्या शरीराचा जर डीपी दादाला हात लागला तर त्यांना वाटलं मला गुदगुल्या झाल्या. कॅमेऱ्यासमोर जाईल की महाराष्ट्राचा छोटा पुढारी गुदगुल्या करतो. मी डायरेक्ट डीपी दादाला नॉमिनेट करतोय" असे तो म्हणाला. एकंदरीतच घन:श्यामची तोफ धडाडली असून त्याने थेट कोल्हापूरचा ढाण्या वाघ धनंजयलाच नॉमिनेट केले आहे.
पहिल्यांदाच पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, अंकिता प्रभू-वालावलकर, सूरज चव्हाण आणि पुरुषोत्तमदादा पाटील हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. त्यामधील कोणत्या स्पर्धकाचा प्रवास आज संपणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
गावरान भाषा जपणारा कोल्हापूरचा बिजनेसमन म्हणजेच धनंजय पोवार. उद्योजक ते फेमस रील स्टार असा प्रवास करणारा कोल्हापुरी गडी आहे. घरी आई आणि बायकोच्या आदेशाबाहेर न जाणारे धनंजय पोवार आता बिग बॉसचे आदेश देताना दिसत आहे.
वाचा: 'गुलिगत' सूरज चव्हाणचे एका दिवसाचे मानधन ऐकून कलाकारांना धक्का, वाचा रिल स्टारच्या मानधनाविषयी
गर्दी जमवणारा, सभा गाजवणारा, व्यासपीठावरुन भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीची 'बिग बॉस मराठी'च्या घरातील एण्ट्री सर्वांनाच चकीत करणारी ठरली. छोटा पुढारी म्हणजे घन:श्याम दरवडे. घन:श्याम दरवडेच्या प्रत्येक स्टेटमेंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असतो. आपली मतं रोखठोक मांडणारा, मोठमोठ्या नेत्यांना चॅलेंज देणारा हा एक पुढारी आहे.
संबंधित बातम्या