तुमचा मुलगा काही करू शकत नाही, त्याची उंची नाही; 'बिग बॉस मराठी ५'च्या घरात छोटा पुढारी रडला!-bigg boss marathi season 5 episode 11 chota pudhari ghanashya daravade ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  तुमचा मुलगा काही करू शकत नाही, त्याची उंची नाही; 'बिग बॉस मराठी ५'च्या घरात छोटा पुढारी रडला!

तुमचा मुलगा काही करू शकत नाही, त्याची उंची नाही; 'बिग बॉस मराठी ५'च्या घरात छोटा पुढारी रडला!

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 07, 2024 02:15 PM IST

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीच्या घरात छोटा पुढारी आणि डीपी दादा एकत्र बसून गप्पा मराताना दिसतात. पण अचानक घन:शाम हा भावूक होतो. त्याच्या कुटुंबाला समाजातील लोकांनी कशाप्रकारणे हिणवले हे सांगितले आहे.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi: छोट्या पडद्यावर सुरु असलेला बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोचा पाचवा सिझन सुरु आहे. नुकताच बिग बॉसच्या घरात पहिला कॅप्टनसी टास्क पार पडला. 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' असं या कॅप्टनसी कार्याचं नाव होतं. या टास्कमध्ये 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर विजयी झाली आणि 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सिझनची पहिली कॅप्टन झाली. पण दुसरीकडे आपल्याला कॅप्टन होता आले नाही म्हणून अरबाज, निक्की, वैभव, जान्हवी यांचा राग अनावर होतो. घन:श्यामला खूप वाईट वाटते. दरम्यान, घन:श्याम डीपी दादाशी खासगी आयुष्यावर बोलत रडताना दिसतो.

घन:श्याम लागला ओक्साबोक्शी रडू

आपण सध्या घरात पाहिले की दोन टीम झाल्या आहेत. एक अरबाज, निक्की, जान्हवी, वैभव, घन:श्यामची टीम. तर दुसरी वर्षा, अंकिता, निखिल, पॅडी, डीपी, योगिता यांची टीम झाली आहे. कॅप्टनसी टास्कमध्ये दुसरी टीम जिंकते. अंकिता घराची पहिली कॅप्टन होते. अंकिता कॅप्टन झाल्यावर डीपी अंकिताला थेट उचलून कॅप्टनच्या खोलीत नेतात. तर अभिजीत तिच्यासाठी गाणं म्हणतो. यानंतर गेम अनफेअर झाला म्हणून घन:श्याम ओक्साबोक्शी रडू लागतो.

घन:श्यामने व्यक्त केल्या मनातील भावना

सध्या सोशल मीडियावर बिग बॉसचा एक नवा प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये 'छोटा पुढारी' घन:श्याम दरवडे धनंजय पोवारकडे आपल्या मनातील भावना व्यक्त करताना दिसून येत आहे. टास्कमध्ये हरल्याने घन:श्यामला खूप वाईट वाटत आहे. धनंजयकडे येऊन घन:श्याम सांगतो की,"माझ्या घरच्यांना नेहमी लोक म्हणायचे तुमचा मुलगा काही करू शकत नाही आहे. उंची नाही. आता लोक म्हणतात यांचा मुलगा 'बिग बॉस'मध्ये कसा गेलाय?" यावर घन:श्यामला समजावत धनंजय म्हणतो, "शरीराची उंची मापता आली नाही, त्याला मनाची उंची काय माफता येणार?"
वाचा: 'मला महाराष्ट्राचे राजकारण तुझ्यात दिसतंय', अंकिता वालावलकरचा छोट्या पुढारीला टोला

अंकिता वालावलकर 'बिग बॉस मराठी'च्या घरात आता कॅप्टन म्हणून वावरत आहे. तिला बिग बॉसने दिलेल्या जबाबदाऱ्या ती योग्य पद्धतीने पार पाडणार का? घरातील इतर सदस्य तिला सगळ्या गोष्टी मदत करणार का? हे सगळे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता आगामी भागात काय होणार हे पाहण्यासाठी तुम्हाला आजचा एपिसोड पाहावा लागेल.

कोण आहे घन:श्याम दरवडे?

गर्दी जमवणारा, सभा गाजवणारा, व्यासपीठावरुन भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीची 'बिग बॉस मराठी'च्या घरातील एण्ट्री सर्वांनाच चकीत करणारी ठरली. छोटा पुढारी म्हणजे घन:श्याम दरवडे. घन:श्याम दरवडेच्या प्रत्येक स्टेटमेंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असतो. आपली मतं रोखठोक मांडणारा, मोठमोठ्या नेत्यांना चॅलेंज देणारा हा एक पुढारी आहे.