Bigg Boss Marathi Day 48 : 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन दिवसेंदिवस रंगतदार होत चालला आहे. वैभव, निक्की आणि अरबाज या तिघांचा एक ग्रूप झाला आहे. तर दुसरीकडे वर्षा उसगावकर, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, पॅडी कांबळे, आर्या, सूरज, संग्राम, डीपी दादा यांचा एक चांगला ग्रूप आहे. जान्हवी मात्र स्वतंत्र खेळताना दिसते. नुकताच घरात कॅप्टनसी टास्क पार पडला. या टास्कमध्ये आर्याने थेट निक्कीच्या कानशिलात लगावली. आता बिग बॉस आर्याला कठोर शिक्षा देताना दिसत आहेत.
बिग बॉसच्या घरात कॅप्टनसी पदाच्या टास्कदरम्यान जादुई हिरा मिळवण्याची धडपड करताना हा प्रकार घडला आहे. कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस बोलताना दिसत आहेत. "घरात आर्या आणि निक्की यांच्यामध्ये एक निंदनीय घटना घडली. आर्या यांनी हे निंदनीय कृत्य करुन बिग बॉसच्या मुलभूत नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे बिग बॉस आर्या यांना आता शिक्षा ठोठावत आहे" असे ते म्हणाले. आता बिग बॉस आर्याला काय शिक्षा देणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
निक्कीच्या कानशिलात लगावत आर्याने 'बिग बॉस'च्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे बिग बॉस आर्याला काय शिक्षा ठोठावणार? हे जाणून घेण्याची सर्वांनाच आता उत्सुकता आहे. कानशिलात लगावल्यानंतर निक्कीने बिग बॉसला आर्याला घरी पाठवा अशी विनंती केली होती. आता बिग बॉस काय निर्णय घेणार हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.
वाचा: 'बिग बॉस मराठी'साठी अभिजीत-निक्कीने घेतले लाखो रुपये, सूरज चव्हाणला आठवड्याला किती मिळते फी?
बिग बॉसने कॅप्टन्सी टास्क म्हणून एक नवीन खेळ या घरातल्यांना दिला आहे. कॅप्टन्सीसाठीच्या या टास्कमध्ये स्पर्धकांना दिलेल्या डायमंडचे संरक्षण करायचे आहे. यावेळी आर्या जान्हवीला मदत करताना दिसत होती. बाथरुम भागात असलेला डायमंड वाचवण्यासाठी आर्या जान्हवीला मदत करते. आर्या थेट बाथरुमचे दार बंद करते. निक्का अरबाजची मदत घेऊन त्या भागात जाण्याचा प्रयत्न करत असते. दोघींमध्ये चांगलीच झटापटी होते. पण आर्या नकळत निक्कीच्या कानाखाली आवाज काढते. आता यावर बिग बॉस काय शिक्षा देणार हे आजच्या भागात पाहायला मिळणार.
संबंधित बातम्या