Bigg Boss Marathi Day 38 : 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. घरातील स्पर्धकांमध्ये दिवसेंदिवस वाद वाढतच चालला आहे. अशातच निक्की तांबोळी ही सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. तिचे वागणे प्रेक्षकांना सतत खटकत असते. पहिल्या दिवसापासूनच हा कार्यक्रम प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. गेल्या आठवड्यात अरबाजचं रौद्र रुप पाहायला मिळालं होतं. यंदाच्या या कठीण आठवड्यात प्रेक्षकांना अनेक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. या आठवड्यात निक्की बिग बॉसच्या घरातील सर्व नियम मोडताना दिसणार आहे.
कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉस मराठीच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये निक्की घरातील सर्वच नियम मोडताना दिसत आहे. प्रोमोमध्ये निक्की वर्षा ताईंना म्हणतेय,"मी कोणतीही ड्यूटी करणार नाही." त्यावर वर्षा ताई निक्कीला म्हणतात,"तू अशी मनमानी करू शकत नाही." निक्की झोपेचे नाटक करत असल्याने घरात कोंबडा आरवतो. ते पाहून आर्या तिच्यावर थंड पाणी ओतणार असल्याचे म्हणते. अभिजीत तिला जाऊन समजावण्याचा प्रयत्न करतो. पण ऐकेल ती निक्की कसली. आता निक्कीला बिग बॉस काय शिक्षा देणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
या कठीण आठवड्यात प्रेक्षकांना अनेक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. या आठवड्यात कोण रद्दी ठरलं हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. सहाव्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्कमध्ये अनेकांचे नंबर लागले आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अरबाज पटेल हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या सदस्यांपैकी कोण आपला गेम प्लॅन अधिक चांगला आखणार? कोण सेफ होणार आणि कोण अनसेफ होणार? याकडे 'बिग बॉस' प्रेमींचं लक्ष लागलं आहे.
Bigg Boss Marathi Video: 'बिग बॉस'च्या घरात सूरजने केली अरबाजची नक्कल, व्हिडीओ पाहून होईल हसू अनावर
आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी डोंबिवलीची मराठी मुलगी आहे. हिंदी बिग बॉसमध्ये अनेकांना टक्कर देत टॉप थ्री मध्ये पोहोचली होती. राखी सावंत आणि निक्कीमधील वाद हे जगजाहीर होते. बोल्ड, बिनधास्त आणि सुंदर असलेल्या निक्कीने आयुष्यातील तिचे नियम स्वत:च ठरवले आहेत. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात ती मनमानी करताना दिसत आहे.