'उथळ पाण्याला खळखळाट खूप', जान्हवीने पॅडी कांबळेचा अपमान करताच विशाख सुभेदार संतापली-bigg boss marathi season 5 day 25 vishakha subhedar slam janhvi killekar for insulting paddy kambale ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'उथळ पाण्याला खळखळाट खूप', जान्हवीने पॅडी कांबळेचा अपमान करताच विशाख सुभेदार संतापली

'उथळ पाण्याला खळखळाट खूप', जान्हवीने पॅडी कांबळेचा अपमान करताच विशाख सुभेदार संतापली

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 21, 2024 01:53 PM IST

Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या घरातील स्पर्धक जान्हवी किल्लेकर ही सध्या चर्चेत आहे. तिने पॅडी कांबळेला 'जोकर' असे म्हटले आहे. त्यामुळे इंडस्ट्रीमधील कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi season 5 Day 25 : सध्या छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो 'बिग बॉस मराठी'ने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक दिवसेंदिवस प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहेत. पण शोमधील स्पर्धक जान्हवी किल्लेकर ही तिच्या वादग्रस्त वस्तव्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते. नुकताच जान्हवीने घरातील स्पर्धक पॅडी कांबळेच्या करिअरवर वक्तव्य केले. ते ऐकून इंडस्ट्रीमधील इतर कलाकारांना राग अनावर झाला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

अभिनेत्री विशाखा सुभेदार आणि पॅडी कांबळे यांची मैत्री सर्वांनाच माहिती आहे. नुकताच विशाखाने बिग बॉसचा एपिसोड पाहिला. या एपिसोडमध्ये जान्हवीने पॅडीला 'जोकर' म्हटले. ते पाहून विशाखाने संताप व्यक्त केला आहे. विशाखाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पॅडी कांबळेचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने निक्की तांबोळी आणि जान्हवीला चांगलेच सुनावले आहे.

काय आहे विशाखाची पोस्ट?

"केहता है जोकर सारा जमाना आधी हकीकत आधा फसाना.. पॅडी more power to u. विनोदी कलाकाराला कायमच हलक्यात घेतात बाकीचे लोक. निक्की बाई तुम्ही पॅडी कांबळे यांना 'जोकर' म्हणालात.. ! आता जोकर म्हणजे कोण? तर जो आपले अश्रू लपवून लोकांचं मनोरंजन करतो, त्यांना हसवतो. तो म्हणजे जोकर. हे काम बाप जन्मात तुम्हाला जमणार नाही. त्यासाठी हिम्मत लागते, ती तुमच्याकडे नाही. गेली अनेक वर्ष हे काम तो करतोय. उथळ पाण्याला खळखळाट खूप. हे विधान निकी आणि जान्हवीसाठी एकदम परफेक्ट आहे. आणि अगं S मुली.. तुझा जन्म कदाचित २००० तला असावा आणि पॅडी यांनी आपल्या कामाची कारकिर्दीची सुरुवात केली १९९८ मध्ये. त्यांनी त्यांच्या नाटकाचे केलेले प्रयोग, त्यांच्यासाठी जमणारी गर्दी, छू बंड्या ज्याचे वेड अजून आहे महाराष्ट्राला.. येड्यांची जत्रा मधला नयन राव, ही आणि अशी अनेक पात्र त्यांनी रंगवलेली आहेत" असे विशाखा म्हणाली.

पुढे ती म्हणाली, "जान्हवी तुझ्यासारखे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले पंढरीनाथ नाही ते.. गेली अनेक वर्ष रंगभूमीच्या रंगात न्हाऊन निघालेले पंढरीनाथ आहेत ते..! आणि त्यांच्या विनोदाचा टाइमिंग याबद्दल तर तू बोलायच नाही. नखाची किंमत नाहीये तुला. आणि वर्षाताईंचा तुम्ही खूप अपमान केलाय अत्तपर्यंत.. Game आहे game आहे असं म्हणतं मी दोन तीन एपिसोड पहिले पण तुम्ही तर थांबतच नाही आहात.. ताईंनी ग्लॅमर मिळवून दिल मराठी सिनेमाला... त्याकाळी सोशल मीडिया नव्हता बाई... त्यांच्या दमावर त्याकाळातल्या कलाकारांवरच्या प्रेक्षक प्रेमामुळे, नाटक सिनेमे हाउसफुल्ल व्हायचे..! त्यांना कमी लेखण बंद करा जरा बोलताना भान ठेवा.. विनोदामुळे तो माणूस जगलाय, टिकलाय, ५० शी पूर्ण झालीय त्याची तरीही आजही स्लॅपस्टिकचा बाप आहे तो.. शांत आहे याचा अर्थ अस नाहीये कीं त्याल सेल्फ रिसपेक्ट नाहीये..!"

आता थोडं पॅडी बद्दल..

पॅडी माऊली तूझा खेळ तू खुप सभ्यपणे, हुशारीने, संयम बाळगून खेळतोयस मित्रा...! आता तर तू जोरात आलायस..! इतका हिडीस बोलल्यानंतर ही तुझ्या तोंडून वाईट शब्द निघत नाहीयत त्याबद्दल तुला सलाम... खचून जाऊ नकोस...! टास्कमध्ये जोर लावून खेळ मित्रा..! तू वयाने मोठा आहेसच आणि शिवाय माणूस म्हणून मोठा आहेस हे दाखवून दिलस आज. एक उत्तम रिअॅक्टर असूनही तू रिऍक्ट झाला नाहीस त्याबद्दल तुझे खुप खुप कौतुक...! बाकी तुझ्या फळांनी मज्जा आणली. काय टायमिंग भन्नाट. निकीच्या अंगणात तू जाणारच नाहीस हे तू बरं नाही करत.. खरंतर जा रोज जा.. आणि तिचे वाळत घातले पापड असतील ना त्याच्यावर नाच. तिच्या आवाजासारखाच आवाज येईल त्या पापडा चा...! करियर वर बोलायच नाही...
वाचा: 'तू पण भवऱ्यासारखी फिरतेय', अभिजीतमुळे अरबाज अन् निक्कीच्या मैत्रीत फूट

‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून जान्हवी किल्लेकर हिच्या विचित्र वागण्याची सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मालिकेमध्ये खलनायिका साकारलेली जान्हवी खऱ्या आयुष्यात देखील खलनायिका बनताना दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात जान्हवीने गेल्या २४ दिवसांत अनेकांचा अपमान केला. खेळाच्या रागात तिने या घरातील ज्येष्ठ कलाकारांच्या करिअरवर देखील बोट उचललं आहे. काहीच दिवसांपूर्वी वर्षा उसगांवकर याच्या अभिनय कारकीर्दीवर ताशेरे ओढणाऱ्या जान्हवीने आता प्रेक्षकांच्या लाडक्या पॅडीदादा म्हणजेच पंढरीनाथ कांबळे यांच्या अभिनयावर टीका केली आहे.