Bigg Boss Marathi season 5: 'बिग बॉस मराठी' हा भावनांचा खेळ आहे. आता चौथा आठवडा सुरू झाला असून सदस्यांचे खरे रंग दिसायला सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात सदस्यांनी तिन आठवड्यातच नाती निर्माण केली आहेत. छोटा पुढारी आणि निक्कीमध्ये बहिण-भावाचं नातं निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे. पण आज रक्षाबंधनाच्या दिवशीच या भावा बहिणीच्या नात्यात फूट पडलेली पाहायला मिळणार आहे. निक्की आणि छोटा पुढारीमध्ये मोठा वाद झाला आहे.
कलर्स मराठी वाहीनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉस मराठीच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये घरातील स्पर्धक रक्षाबंधन साजरे करताना दिसत आहेत. पण हा सण साजरा करताना मात्र, निक्की आणि छोटा पुढारी यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला आहे. प्रोमोमध्ये निक्की घन:श्यामला म्हणतेय, "तू फेक आहेस." त्यावर घन:श्याम तिला विचारतो, "काय फेक वागलोय ते तर सांग.. तू किती आपली आहेस हे अख्ख्या जनतेला दिसतंय... तुला सख्ख्या बहिणीचा दर्जा दिला होता मी.. यावर निक्की म्हणते, "नको देऊ. त्यावर घन:श्याम म्हणतो, "निक्कू ताई बोलल्यामुळेच घात झालाय ना."
निक्की तांबोळी आणि छोटा पुढारी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. आम्ही दोघे बहीण -भाऊ म्हणत छोट्या पुढारीने निक्की सोबत मैत्री केली. पण दोघांच्या पप्पी आणि झप्पीमुळे प्रेक्षकांनी त्यांची खिल्ली उडवली. आता ऐन रक्षाबंधनच्या दिवशीच त्यांच्यात मोठा वाद झालेला पाहायला मिळेल.
वाचा : "झुंड में भेडिये आते हैं, शेर अकेला ही आता है", रितेश देशमुखने केले सूरज चव्हाणचे कौतुक
नुकताच बिग बॉसच्या घरातून दोन स्पर्धकांना बाहेर पडावे लागले आहे. 'कलर्स मराठी'वरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेतील सर्वगुणसंपन्न, हवीहवीशी वाटणारी अंतरा अर्थात योगिताने 'बिग बॉस मराठी'च्या घरात सुसाट प्रवास करायला सुरुवात केली आणि लगेचच तिच्या प्रवासाला ब्रेक लागला. 'बिग बॉस मराठी'चा खेळ, सदस्यांसोबत जमवून घेण्यात ती कमी पडली. तर दुसरीकडे कलर्स मराठीच्या 'रमा राघव' या मालिकेत राघवच्या भूमिकेच्या माध्यमातून आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ पाडणारा निखिल दामले मात्र 'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून प्रेक्षकांवर भुरळ पाडण्यात कमी पडला.