इंडियन आयडल जिंकल्यानंतर मिळालेल्या पैशांचे अभिजीत सावंतने काय केले? वाचा सविस्तर
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  इंडियन आयडल जिंकल्यानंतर मिळालेल्या पैशांचे अभिजीत सावंतने काय केले? वाचा सविस्तर

इंडियन आयडल जिंकल्यानंतर मिळालेल्या पैशांचे अभिजीत सावंतने काय केले? वाचा सविस्तर

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 28, 2024 10:40 PM IST

Abhijit Sawant: गायक अभिजिती सावंतची बिग बॉस मराठी सिझन ५मध्ये एण्ट्री झाली आहे. त्यामुळे त्याच्याविषयी जाणून घेण्यास सर्वजण उत्सुक आहेत. चला जाणून घेऊया...

<p>इंडियन आयडल जिंकलेला गायक अभिजीत सावंत बिग बॉस मराठी सिझन ५च्या घरात दिसणार आहे त्यामुळे प्रेक्षकांमध्ये शोबाबत उत्सुकता वाढली आहे.</p>
<p>इंडियन आयडल जिंकलेला गायक अभिजीत सावंत बिग बॉस मराठी सिझन ५च्या घरात दिसणार आहे त्यामुळे प्रेक्षकांमध्ये शोबाबत उत्सुकता वाढली आहे.</p>

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जेव्हा या सिझनची घोषणा करण्यात आली तेव्हा पासून घरात कोणते स्पर्धक दिसणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आता या शोमधील स्पर्धकांचे चेहरे समोर आले आहेत. त्यामध्ये इंडियन आयडल विजेता अभिजीत सावंतचा देखील समावेश आहे. आता अभिजीत विषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. चला जाणून घेऊया...

अभिजीत सावंत विषयी

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो पैकी एक शो म्हणजे 'इंडियन आयडल.' या शोने आजवर अनेक गायकांचे आयुष्य बदलून टाकले आहे. तसेच शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक हे कायम चर्चेचा विषय देखील ठरतात. इंडियन आयडलच्या पहिल्या पर्वाचा विजेता अभिजीत सावंतने त्याच्या आवाजाने अनेकांची मने जिंकली होती. त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले. पण शो जिंकल्यानंतर अभिजीतने मिळालेल्या पैशांचे काय केले असा प्रश्न अनेकांना पडला होता. एका मुलाखतीमध्ये अभिजीतने याबाबत खुलासा केला होता.

काय केले पैशांचे?

'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत रातोरात स्टार झाला होता. त्याला अनेक गाण्यांच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. एका मुलाखतीमध्ये त्याने शो जिंकून मिळालेल्या पैशांचे काय केले सांगितले होते. 'शो जिंकल्या नंतर मिळालेल्या पैशांची मी योग्य गुंतवणूक केली. २००८ ला आर्थिक मंदीदरम्यान आम्ही पैशांची बचत केली होती. त्या पैशांचीही योग्य ठिकाणी गुंतवणूक केली. नंतर मी एक घर खरेदी केले. पण तो निर्णय माझा चुकीचा होता. आता मला त्याचा पश्चाताप होतो' असे अभिजीत म्हणाला.
वाचा: हिंदी बिग बॉसमधून मने जिंकणारी निक्की तंबोळी मराठी बिग बॉसच्या घरात

पुढे तो म्हणाला, 'सर्व काही नीट सुरु होते. मला अनेक ऑफर्स आल्या होत्या. मी अनेक गाणी गायिली होती. पण मी असमाधानी होतो. कारण तुम्ही जेव्हा पैशांच्या मागे धावता तेव्हा तुमची प्रतिभा, तुमचे संगीत, तुमचे ज्ञान यासारख्या अनेक गोष्टींशी तुम्हाला तडजोड करावी लागते.'

बिग बॉस मराठीचे स्पर्धक

बिग बॉस मराठी सिझन ५ नुकताच सुरु झाला आहे. या सिझनमध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकर, अभिनेत्री निक्की तंबोळी, पॅड कांबळे, अंकिता प्रभू-वालावलकर, निखिल, असे अनेक कलाकार दिसत आहेत.

Whats_app_banner