Bigg Boss Marathi Season 5: छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जात आहे. या कार्यक्रमाने टीआरपीचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धक निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल हे सतत चर्चेत आहेत. त्या दोघांमध्ये नेमकं काय नातं आहे? असा प्रश्न सर्वांना पडत आहे. अशातच अरबाजच्या कथित गर्लफ्रेंडने एक निर्णय घेतला आहे. तिने घेतलेल्या निर्णयाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
‘बिग बॉस…’च्या घरात पाहिल्याच दिवसापासून निक्की व अरबाजमध्ये जवळीक पाहायला मिळाली होती. मात्र एका एपिसोडमध्ये त्याने खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला होता. यामध्ये त्याने रिलेशनशिपमध्ये असल्याचे कबूल केले होते. ते ऐकून घरातील स्पर्धक, प्रेक्षक सर्वांनाच धक्का बसला होता. अरबाजच्या गर्लफ्रेंडचे नाव लिझा बिंद्रा असे आहे. लिझा देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अरबाज आणि लिझाचे एकत्र व्हिडीओ देखील समोर आले होते. पण आता अरबाजच्या गर्लफ्रेंडने मोठा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी लिझाने पोस्ट शेअर करत 'कृपा करुन मला अरबाजविषयी कोणतेही प्रश्न विचारु नका' असे म्हटले होते. तसेच तुमच्या या प्रश्नांमुळे मला खूप त्रास होत असल्याचे देखील ती म्हणाली होती. आता लिझाने मोठा निर्णय घेतला आहे. तिने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. “मी काही काळासाठी सोशल मीडिया सोडत आहे. सर्वांना प्रेम, हसत राहा” असे लिझाने म्हटले आहे. लिझाच्या या पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
वाचा: आता राडा होणार! वाईल्ड कार्ड एण्ट्री होताच संग्रामने दिली अरबाजला धमकी
'मला कुणाबद्दलही कोणती वाईट गोष्ट ऐकायला आवडत नाही. ती गोष्ट मग अरबाज आणि निक्कीबाबत असली तरीही मला ती ऐकायला आवडणार नाही. त्यामुळे जर माझ्याकडे कुणी आलं आणि कुणाबद्दल वाईट बोललं गेलं तर ते मी अजिबातच ऐकून घेणार नाही. त्याचप्रमाणे मी आधी जसं सांगितलं होतं, त्याचप्रमाणे आपल्याला कुणालाही बोलण्याचा अधिकार नाही. हे सगळं देवावर सोडून देऊया. काय बरोबर आहे आणि काय चूक आहे, मला खरंच माहित नाही. त्यामुळे कुणालाही वाईट बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही' असे लिझाने पोस्टमध्ये म्हटले आहे.