Bigg Boss Marathi Day 47 : 'बिग बॉस मराठी'चा सातवा आठवडा सुरू आहे. गेल्या आठवड्यात घन:श्याम दराडे घराबाहेर गेला. आता या शोमध्ये बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. संग्रामच्या एन्ट्रीने बिग बॉस मराठीच्या खेळाला एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. निक्की आणि अरबाज सतत संग्रामच्या पाठीमागे काही ना काही बोलताना दिसत आहेत. आता आजच्या भागात प्रेक्षकांना खरी मजा पाहायला मिळणार आहे. कारण टास्कमध्ये संग्राम आणि अरबाजची जोरदार वादावादी होणार आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरात संग्राम चौगुलेची एन्ट्री झाल्यानंतर घरातील वातावरण बदलताना दिसत आहे. संग्रामनं पहिल्याच दिवशी अरबाज आणि निक्कीबरोबर पंगा घेतला आहे. त्यामुळे निक्की आणि अरबाज संग्रामविरोधात आहे. तसेच संग्राम हा घरातील इतर सदस्यांबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण आता बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये अरबाज आणि संग्राम आमनेसामने येणार आहे. कोणाची ताकद जास्त हे कळणार आहे.
कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'बिग बॉस मराठी'चा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये संग्रामने टास्कमध्ये पुन्हा एकदा अरबाजसोबत पंगा घेतलेला दिसत आहे.'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रेक्षकांना ताकदीचा सामना पाहायला मिळेल. अरबाज आणि संग्राम एकमेकांसोबत चांगलेच भिडताना दिसून येतील. अरबाज-संग्रामने केलेले ताकदीचा वापर पाहून घरातील वातावरण मात्र तापणार आहे. त्या दोघांना शांत करण्याचा सर्वजण प्रयत्न करत आहेत. आता ते दोघेही शांत होणार की बिग बॉसचा एखादा नियम मोडणार हे बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आजच्या भागाची उत्सुकता लागली आहे.
वाचा: विकास सेठीच्या पत्नीने शेअर केला अभिनेत्याचा जुना व्हिडिओ, पाहून डोळ्यात येतील अश्रू
बॉडीबिल्डर संग्राम चौगुले सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे. त्याचे दीड मिलियन फॉलोअर्स आहेत. फिटनेसवर त्याने प्रचंड मेहनत घेतलेली आहे. आजवर त्याने अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्याने सहा वेळा मिस्टर इंडिया आणि पाच वेळा मिस्टर महाराष्ट्राच्या किताबावर आपले नाव कोरले आहे. त्याची स्वत:ची एक आलिशान जीमदेखील आहे. आता तो बिग बॉसच्या घरात कसा खेळणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.